मुंबई- येस बँक प्रकरणी अनिल अंबानी यांना 30 मार्चला पुन्हा ईडीच्या चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता चौकशीसाठी आलेल्या अनिल अंबानी यांची 10 तासाहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली. यात येस बँकेकडून घेतलेल्या 12,800 कोटींच्या कर्जा संदर्भात ही चौकशी करण्यात येत आहे.
अनिल अंबानी यांना 30 मार्चला पुन्हा हजर राहण्याचे ईडीकडून समन्स
अनिल अंबानी यांना ईडी कार्यालयात हजर व्हायचे होते. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव अनिल अंबानी यांनी पुढील तारखेची मागणी केल्याचे ईडी सूत्रांकडून कळत आहे. ईडीकडून मनी लाँडरिंगच्या संदर्भात राणा कपूर यांची चौकशी सुरू आहे.
सोमवारी अनिल अंबानी यांना ईडी कार्यालयात हजर व्हायचे होते. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव अनिल अंबानी यांनी पुढील तारखेची मागणी केल्याचे ईडी सूत्रांकडून कळत आहे. ईडीकडून मनी लाँडरिंगच्या संदर्भात राणा कपूर यांची चौकशी सुरू आहे. अनिल अंबानी यांनी येस बँकेकडून तब्बल 12 हजार 800 कोटींच कर्ज घेतले आहे. जे अद्याप भरण्यात आलेले नाही. येस बँकेचे मोठे कर्जदार म्हणून अनिल अंबानी ग्रुप, एस्सेल ग्रुप, व्होडाफोन, आयएलएफएस, डिएचएफएल यासारख्या कंपन्यांनी मोठे कर्ज घेतले आहे, ज्याची परतफेड होण्यास विलंब होत आहे. ईडीकडून या सर्व कंपन्यांच्या प्रमुखांना चौकशी साठी समन्स बाजविण्यात येत आहेत. यात आता अनिल अंबानी यांनाही मनी लाँडरिंगच्या संदर्भात 30 मार्चला पुन्हा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.