महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Cosmos Bank Fraud Case: कॉसमॉस बँकेची 45 कोटी रुपयांची फसवणूक, विनय अरान्हाला 20 मार्चपर्यंत ईडीची कोठडी - ED custody Vinay Aranha

पुण्यातील कॉसमॉस बँकेमधील कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने विनय विवेक अरान्हा याला अटक केली. त्याला मुंबई सत्र न्यायालयात हजर केले, तेव्हा न्यायालयाने 20 मार्चपर्यंन्त त्याला तुरुंगात धाडले आहे.

Cosmos Bank Fraud
मुंबई सत्र न्यायालय

By

Published : Mar 12, 2023, 9:24 AM IST

मुंबई :दिवसेंदिवस मनी लॉंन्डरिंग संदर्भात घटना आणि त्यातील आरोपींंना कारवाईला सामोरे जाण्याच्या घटना वाढत आहे. पुण्यातील कॉसमॉस बँकेला 45 कोटी रुपयांचा चुना लावल्याचा आरोप विनय विवेक अरान्हा यावर ठेवला आहे. पुण्यातील कॉसमॉस बँकेतील कागदपत्रे अफरातफर करून जनतेचा पैसा हडपल्याचा आरोप ठेवला गेला आहे. यामुळे ईडीकडून त्याला अटक केली गेली आहे. 45 कोटी रुपयांची फसवेगिरी आरोपीने केली आहे. तसेच यासाठी आरोपीने बनावट मालमत्तेची कागदपत्रे तयार केली होती. त्याच्या आधारे त्याने कोट्यवधी रुपयांचा चुना कॉसमॉस बँकेला लावला, ह्या आरोपाखाली ईडीने अटक करून त्वरित मुंबई सत्र न्यायालयात हजर केले.



बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवले : विशेष सत्र न्यायालयाने प्रथम दृष्ट्या आरोपीचा गंभीर गुन्हा असल्याचा आरोप पाहता मुंबई शहर दिवाणी न्यायालयाने ईडीकडून काय आरोप आहेत? ते ऐकून घेतले. ईडीकडून आरोपीवर असलेले आरोप न्यायालयासमोर सादर केले गेले. तसेच बनावट कागदपत्रे आधारे कश्या रीतीने फसवले, ह्या बाबी देखील मांडल्या. त्यात ईडीकडून हे दखल सादर केले गेले की, मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार करून त्याच्या आधारे 45 कोटी रुपयांची कर्जे आरोपीने लाटली आहेत. परिणामी ईडीची कोठडी जरुरी आहे.


ईडीची मागणी : तसेच ईडीकडून ही बाब देखील मांडली गेली की, आरोपीने एक तर मालमत्ता नावे, बनावट कागदपत्रे तयार केली. तसेच जनतेचा पैसा कर्जाऊ घेतला. मात्र ज्या कारणासाठी पैसे कर्ज म्हणून घेतले. त्याऐवजी उधळपट्टी करण्यासाठी तो पैसा वापरला आहे. त्यामुळेच मनी लॉंन्डरिंग तरतुदी अंतर्गत त्या आरोपीस चौकशी करणे अत्यावश्यक आहे. परिणामी त्याची अटक अजून वाढवावी, अशी मागणी देखील केली होती. स्वतःला शिक्षण तज्ञ म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला. त्यामुळे त्याला मदत करणाऱ्या इतर आरोपींची तपासणी करण्यासाठी शोध जरुरी आहे. म्हणून आरोपी विनय याची कोठडी 20 मार्चपर्यंन्त करावी, ही ईडीची मागणी सत्र न्यायालयाने मान्य केली. आता 20 मार्चपर्यंन्त त्याला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

एफआयआरच्या आधारे तपास : आरोपी विनय विवेक अरन्हा यांनी कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक पुणे यांच्याकडून मालमत्तेची बनावट कागदपत्रे बँकेकडे गहाण म्हणून सादर करून एकूण 46 कोटी रुपयांची कर्जे मिळविली होती. त्यानंतर दिलेल्या उद्देशातून कर्ज वळवले आणि त्याचा वापर केला असा आरोप आहे. त्याच्या या उधळपट्टीच्या जीवनशैलीमुळे कॉसमॉस बँकेचे ४५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. कॉसमॉस बँकेचे शिवाजी विठ्ठल काळे यांनी विनय अरान्हा आणि विवेक अँथनी अरान्हा यांच्या विरोधात तक्रार नोंदविली. पुणे पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला. ज्यामध्ये आरोपींनी कॉसमॉस बँकेकडून २०.४४ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे.



ईडीच्या तपासादरम्यान टाळाटाळ आणि असहकार : ईडीच्या तपासात असे दिसून आले आहे की, विनय अरन्हा हा रोझरी एज्युकेशन सोसायटीचा प्रमुख व्यक्ती होता. त्याने शाळांचे नूतनीकरण आणि पुनर्विकास करण्याच्या उद्देशाने 46 कोटी रुपयांची एकूण 7 कर्जे घेतली होती. तथापि, या कर्जाच्या रकमा वापरण्याऐवजी, त्याच्या मित्र आणि सहयोगींच्या संगनमताने त्यांनी मेसर्स पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर, शब्बीर पाटणवाला, अश्विन कामत आणि मेसर्स दीप्ती एंटरप्रायझेस यांना 21 कोटी रुपये हस्तांतरित केले. तसेच त्याने सेलिब्रेटींना गाला इव्हेंट आयोजित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले आणि स्वत:ची उन्नती केली आणि लक्झरी कार देखील खरेदी केल्या. ईडीच्या तपासादरम्यान त्याने टाळाटाळ आणि असहकार केला. त्याने ईडीच्या अनेक समन्सला प्रतिसाद दिला नाही. तसेच जारी केलेले समन्स नाकारले अशा पोस्टल टिप्पण्यांसह वितरित न करता परत केले गेले. ईडीसमोर हजर राहू नये म्हणून तो ईडीकडे बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर करत असल्याचे आढळून आले, असे ईडीने सांगितले आहे.

हेही वाचा : Sadanand Kadam News: सदानंद कदम यांना 15 मार्चपर्यंत ईडीची कोठडी, घरातून जेवण पुरविण्यास कोर्टाची परवानगी

ABOUT THE AUTHOR

...view details