मुंबई - राज्याच्या राजकारणात मोठी घटना घडत असून ठाकरे गटातील मोठ्या नेत्याला अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडीने ) दणका दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब ( Shiv Sena leader Anil Parab ) यांची संपत्ती ईडीकडून जप्त ( Anil Parab property seized ) करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून ( ED action in case of Sai Resort in Dapoli ) ही कारवाई झाली असून ईडीने यासंदर्भात सविस्तर परिपत्रक काढले आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील ४२ गुंठे जमीन आणि तिथे बांधलेल्या साई रिसॉर्टचा समावेश आहे.
जवळपास चार ते पाच दिवस झाली होती चौकशी :अनिल परब यांची एवढ्या कोट्यावधीची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून १० कोटी २० लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने मनी लॉन्डिरिंगचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अनिल परब यांची वारंवार चौकशी झाली. जवळपास चार ते पाच दिवस ही चौकशी झाली होती.