महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ED arrests Jet Airways founder Naresh Goyal : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक; ईडीची कारवाई - Canara Bank defrauding Case

ED arrests Jet Airways founder Naresh Goyal : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मुंबई कार्यालयात दिवसभर झालेल्या चौकशीनंतर शुक्रवारी (1 सप्टेंबर) रात्री उशिरा ईडीने गोयल यांना अटक केली. कॅनरा बँकेच्या कथित 538 कोटींच्या घोटाळा प्रकरणी ईडीने ही कारवाई केली.

ED Action On Jet Airways
नरेश गोयल यांना ईडीने केली अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 6:47 AM IST

Updated : Sep 2, 2023, 7:15 AM IST

मुंबई -ED arrests Jet Airways founder Naresh Goyal : कॅनरा बँकेची कथित 538 कोटी रुपयांची फसवणूक (Canara Bank defrauding Case) केल्याप्रकरणी नरेश गोयल यांची चौकशी केली जात होती. याच प्रकरणात आता त्यांना ईडीकडून अटक (ED Arrest Naresh Goyal) करण्यात आली आहे. जुलै महिन्यामध्ये ईडीने नरेश गोयल आणि इतरांविरुद्ध नव्याने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी या प्रकरणी मुंबई आणि दिल्लीतील सुमारे आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते.

चौकशीनंतर घेतले होते ताब्यात : शुक्रवारी चौकशीसाठी ईडीने नरेश गोयल यांना ताब्यात घेतले होते. मुंबईतील ईडी कार्यालयात ईडीने गोयल यांची दिवसभर चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिरा नरेश गोयल यांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीने यावर्षी 19 जुलैला नरेश गोयल यांच्यासंदर्भात मुंबई आणि नवी दिल्लीत छापेमारी केली होती.

मुंबई, दिल्लीत छापेमारी : कॅनरा बँकेतील कथित 538 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल आणि कंपनीच्या काही माजी अधिकाऱ्यांविरुद्ध ईडीने यापूर्वी एफआयआर दाखल केला होता. तसेच मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) केलेल्या तपासाचा भाग म्हणून मुंबईतील सात ठिकाणी आणि इतर काही ठिकाणी ईडीने छापे टाकले होते. या छापेमारीत महत्वाचे पुरावे ईडीच्या हाती लागले होते, अशी माहिती मिळाली होती.

काय आहे प्रकरण : सीबीआय एफआयआर नुसार, जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याविरोधात गेल्या वर्षी 11 नोव्हेंबरला दाखल केलेल्या लेखी तक्रारीत फसवणूक, गुन्हेगारी कट, गुन्हेगारी विश्वासाचा भंग आणि गुन्हेगारी गैरवर्तनाचा आरोप आहे. कॅनरा बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक पी संतोष यांनी दिलेल्या तक्रारीत अनिता नरेश गोयल, गौरांग आनंदा शेट्टी, अज्ञात लोकसेवक आणि इतरांचा उल्लेख आहे. सीबीआयनं जेट एअरवेज आणि तिच्या संस्थापकांवर निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.

Last Updated : Sep 2, 2023, 7:15 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details