महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Narayan Rane On Recession : देशात जूनपर्यंत आर्थिक मंदी येण्याची शक्याता- केंद्रीय मंत्री नारायण राणे - Narayan Rane On Recession

देशातील आर्थिक मंदीबाबत केंद्रीय सूक्ष्म, लघू मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. देशात आर्थिक मंदी आली तर, जूननंतर येईल असे सुचक विधान राणे यांनी केले आहे. त्यांच्या हस्ते पुण्यात जी - 20 परिषदेचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी राणे बोलत होते. (G20 Conference)

Narayan Rane
केंद्रीय मंत्री नारायण राणे

By

Published : Jan 16, 2023, 5:08 PM IST

देशात जूनपर्यंत आर्थिक मंदी येण्याची शक्याता- नारायण राणे

पुणे - जगातील काही देशांमध्ये आर्थिक मंदी आली असून त्याचा फटका इतर देशांना देखील बसत आहे. भारतात आर्थिक मंदीचा फटका बसणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर केंद्रीय सूक्ष्म, लघू मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपल मत व्यक्त केले आहे. जगामध्ये आर्थिक मंदी विकसीत देशात आहे. भारताला त्याची झळ बसू नये यासाठी प्रयत्न सुरू आहे. भारतात मंदी आली तर, जून नंतर येईल असे सुचक विधान राणे यांनी केले आहे.

भरड धान्यांचे महत्व वाढणार - मंदीची झळ सामान्य नागरिकांना पोहचू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुण्यात जी - 20 परिषदेचे उदघाटन केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी राणे यांनी जी-२० बैठकस्थळी प्रदर्शन दालनांना भेट दिली. तसेच विविध दालनात प्रदर्शित विषयांची माहिती घेतली. जागतिक भरड धान्य वर्ष- २०२३ च्या निमित्ताने अधिक पौष्टिक तत्वे असलेले बाजरी, ज्वारी, नाचणी आदी भरड धान्यांचे महत्व जागतिक स्तरावर वाढेल यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्या अनुषंगाने जी-२० बैठक स्थळीदेखील भरड धान्याचे महत्व सांगणारी माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. भरड धान्यापासून बनवलेल्या पदार्थांची राणे यांनी माहिती घेतली.

नारायण राणे यांची विविध दालनाला भेट

देशाच्या प्रगतीसाठी विशेष उपाययोजना -महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आखलेल्या पर्यटन उपक्रम, सहलींचे पॅकेजेस आदी विषयी सादरीकरण देखील राणे यांनी पाहिले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते. अमेरिकेचा जी. डी. पी 20 ट्रिलियन आहे. भारत 5 पर्यंत पोहचू पाहत आहे. देशाच्या प्रगतीसाठी, आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी केंद्र सरकारमार्फत विशेष उपाययोजना केल्या जात आहे. तसेच जी 20 परिषदेमध्ये देखील यावर चर्चा होणार आहे.

प्रदुषणामुळे आरोग्याचा प्रश्न - देशातील प्रत्येक नागरिकांना याचा फायदा होणार आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहेत. त्यावर परिषदेत विशेष चर्चा होणार असून केंद्र सरकार युद्ध पातळीवर पावल उचलत असल्याच यावेळी राणे यांनी सांगितले. पुण्यात होत असलेल्या जी 20 परिषदेच्या लोगोवर भाजपचे चिन्ह कमळचा फोटो घेतला आहे. ते कमळ भाजपच आहे की भारताच आहे यावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरवात केली आहे.

शाश्वत विकास म्हणजे कमळ -त्या प्रश्नावर राणे म्हणाले की भारताच कमळ असून त्या कमळला काही अर्थ आहे. भाजप म्हणून कमळ घेतले तरी, माझी काही हरकत नाही. शाश्वत विकास म्हणजे कमळ जो भाजपात येईल. तो स्वतः चा पण विकास करेल, आपला देखील विकास करेल असे यावेळी राणे म्हणाले. राज्यातील अनेक उद्योग बाहेर गेले आहेत. यावर नारायण राणे म्हणाले की, सरकार बदल की सरकारने घेतलेले निर्णय बदलतात. मी या मताशी सहमत नाही. राज्यात 35 वर्षाच्या राजकीय प्रवासात अनेक मंत्रिपद भूषविली आहेत. एखादा निर्णय राज्यातल्या, जनतेसाठी भविष्याच्या दृष्टीने पोषख नसेल तर ,तो निर्णय अपवादात्मक बदलला जातो. मात्र, आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय सहसा बदलला जात नाही असे राणे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -Narayan Rane Vs Uddhav खोके मातोश्रीवरच पोहोचवले जातात, सांगायला लावू नका- नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details