मुंबई- 1 फेब्रुवारीला केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्या अर्थसंकल्पावर आमची बारीक नजर असून या अर्थसंकल्पातून कोणत्या वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार हे पहावे लागणार असल्याचे मत राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी व्यक्त केले.
मध्यमवर्ग करदात्याला दिलासा मिळणार का नाही, तसेच कोणत्या वर्गाला झुकते माप अर्थसंकल्पातून दिले जाणार याकडे देखील लक्ष असणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना केंद्राने अर्थसंकल्प कसा सादर केला याचा आधार राज्य अर्थ संकल्प सादर करत असताना घेत असतात. त्यामुळे केंद्राच्या अर्थसंकल्पची छाप राज्यांच्या अर्थसंकल्पावर जाणवत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.