महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणेशोत्सवासाठी 'इको-फ्रेंडली' गड-किल्ले मखरांना मोठी मागणी - गणेशोत्सव

गणेश उत्सवात होणाऱ्या सजावटीमुळे सामाजिक बदल होत असतो. उत्सवी संस्थेच्या माध्यमातून नानासाहेब शेंडकर यांनी गडकिल्ल्यांची प्रतिकृती असलेल्या इको-फ्रेंडली मखरांची निर्मिती केली आहे. गेल्या 19 वर्षांपासून ते इको-फ्रेंडली मखर बनवत आहेत.

गणेशोत्सवासाठी 'इको-फ्रेंडली' गड-किल्ले मखरांना मोठी मागणी

By

Published : Aug 10, 2019, 7:26 PM IST

मुंबई -छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड-किल्ले हे महाराष्ट्राचे खरे वैभव आहे. या गडकिल्ल्यांचा प्रसार जगभर व्हावा, यासाठी उत्सवी संस्थेच्या माध्यमातून नानासाहेब शेंडकर यांनी गडकिल्ल्यांची प्रतिकृती असलेल्या मखरांची निर्मिती केली आहे. गेल्या 19 वर्षांपासून ते इको-फ्रेंडली मखर बनवत आहेत. नफ्यात असलेला थर्माकॅालचा कारखाना 2001 साली बंद करून नानासाहेब शेंडकर यांनी पर्यावरणपूरक मखरांची निर्मिती सुरू केली.

गणेशोत्सवासाठी 'इको-फ्रेंडली' गड-किल्ले मखरांना मोठी मागणी
मागील वर्षी दिवाळी निमित्त नानासाहेब यांनी गड-किल्ल्यांची प्रतिकृती असलेल्या कंदिलाची निर्मीती केली होती. यावर्षीही गडकिल्ल्यांचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. घरगुती गणपती ते सार्वजनिक गणपतींसाठी मखरं तयार करण्यात आले आहेत. 2 फुटांपासून 24 फुटापर्यंत मखर त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.शिवकालीन इतिहास सर्वांपर्यंत पोहचावा हा माझा प्रयत्न आहे. गणेश उत्सवात होणाऱ्या सजावटीमुळे सामाजिक बदल होत असतो. म्हणून यावेळी गड-किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी हे मखर आणले आहेत. त्याबरोबर लहान मुलांना मखर कसे बनवतात, हे कळावे यासाठी छोट्या आकाराची मखरे केली आहेत. हे मखर ते एका कोड्याप्रमाणे जोडू शकतात, असे शेंडकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details