महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता...शनिवार २९ जून २०१९  संध्याकाळी ७ पर्यंतच्या बातम्या - Cricket

कोंढवा येथे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, एवढी मोठी घटना घडली असताना कामगार मंत्री संजय कुटे मात्र या घटनेबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आलय, पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली,तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक केली असून त्यांच्याकडून 2 कोटी 35 लाख 20 हजार 420 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय, स्पर्धेत जर-तरची गणिते जुळून आली तर भारत विरुध्द पाकचा सामना क्रिकेट रसिकांना पुन्हा पाहायला मिळू शकतो.

आज...आत्ता...शनिवार २९ जून २०१९  संध्याकाळी ७ पर्यंत महत्वाच्या बातम्यांवर एक नजर...

By

Published : Jun 29, 2019, 7:02 PM IST

Updated : Jun 29, 2019, 7:46 PM IST

पुणे दुर्घटना : १५ जणांच्या मृत्यूप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल; बिल्डरसह साईट इंजिनियरचाही समावेश

पुणे - कोंढवा येथे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये बिल्डर, साईट इंजिनियर, सुपरवायझर, कॉट्रॅक्टर यांचा समावेश आहे. या सर्वांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाचा सविस्तर...

पुण्यातील १५ कामगारांच्या मृत्यूबाबत कामगार मंत्रीच अनभिज्ञ, सत्कार स्वीकारण्यात होते दंग

बुलडाणा - पुणे येथील कोंढवा परिसरात रात्री उशिरा एक संरक्षण भिंत कोसळली. त्याखाली १५ मजूरांचा मृत्यू झाला. एवढी मोठी घटना घडली असताना कामगार मंत्री संजय कुटे मात्र या घटनेबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.वाचा सविस्तर...

पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा खदाणीत बुडून मृत्यू

औरंगाबाद - पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली. शुक्रवारी रात्री नक्षत्रवाडी भागात ही घटना घडली. प्रदीप भगवान काजळे (वय ९) आणि तुषार प्रकाश शिरसाठ, अशी मृत मुलांची नावे आहेत. वाचा सविस्तर...

कोल्हापूर पोलिसांना सापडले कोट्यवधींचे घबाड; पाच दरोडेखोरांना अटक
कोल्हापूर - स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक केली असून त्यांच्याकडून 2 कोटी 35 लाख 20 हजार 420 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरोडा तपासासाठी गेलेल्या कोल्हापूर पोलिसांच्या हाती हे कोट्यवधी रुपयांचे घबाड लागले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि सोने दरोडेखोरांकडून जप्त करण्याची ही कोल्हापूर पोलिसांची आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे. वाचा सविस्तर...

ICC WC २०१९ : भारत विरुध्द पाकिस्तान थरार...दोन्ही संघ उपांत्य फेरीत पुन्हा भिडणार?

लंडन - भारत विरुध्द पाकिस्तनचा सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट रसिकांच्या उड्या पडतात. या सामन्याचा 'टीआरपी'ही विश्वकरंडक सामन्याच्या अंतिम सामन्यापेक्षा जास्त असल्याचे अनेक वेळा दिसून आला आहे. आत्तापर्यत भारत विरुध्द पाकिस्तान सामना विश्वकंरडक स्पर्धेच्या इतिहासात ७ वेळा झाला. यात सातही वेळा भारताने पाकिस्तानला धूळ चारली. लंडनमध्ये सुरु असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेतत भारत विरुध्द पाकिस्तान सामन्यात भारताने पाकचा डकवर्थ लुईसच्या नियमानुसार ८९ धावांनी एकतर्फी पराभव केला. याच स्पर्धेत जर-तरची गणिते जुळून आली तर भारत विरुध्द पाकचा सामना क्रिकेट रसिकांना पुन्हा पाहायला मिळू शकतो. वाचा सविस्तर...

बातमी, सर्वांच्या आधी

etvbharat

Last Updated : Jun 29, 2019, 7:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details