गौतम गंभीरचा मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर मोठा आरोप; म्हणाले...
नवी दिल्ली - पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे नव्यानेच निवडून आलेला माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सनसनाटी आरोप केला आहे. मयूर विहार या ठिकाणी आयोजित एका उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
वाचा सविस्तर...
पुण्यात सैराट! गुन्हेगारासोबत प्रेम विवाह करणाऱ्या बहिणाची चुलत भावाकडून हत्या
पुणे - गुन्हेगारासोबत प्रेम विवाह करणाऱ्या तरुणीचा तिच्याच चुलत भावाने खून केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. ऋतुजा विकी वाघ असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून संतोष रोहिदास भोंडवे असे तिचा खून करणाऱ्या चुलत भावाचे नाव आहे.
वाचा सविस्तर...
WC IND vs AFG :मोहम्मद शमीची ऐतिहासिक कामगिरी, विश्वचषकात हॅट्ट्रिक नोंदवणारा दुसरा भारतीय
साऊदॅम्प्टन - अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत भारताने अफगानिस्तावर ११ धावांनी विजय मिळवला. या लढतीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने हॅट्ट्रिक केली. ही या विश्वषकातील पहिलीच हॅट्रीक आहे. शमीने शेवटच्या तीन फलंदाजांना तंबूची वाट दाखवत हॅट्ट्रिक नोंदवली.
वाचा सविस्तर...
औरंगाबादेत उच्च दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे ३ शेतकऱ्यांची घरे जळून खाक
औरंगाबाद - सोयगाव तालुक्यातील गलवाडा या गावात शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक उच्च दाबाचा विद्युत वीजपुरवठा झाल्याने ३ शेतकऱ्यांची घरे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घरातील साहित्य जळून खाक झाल्यामुळे ३ कुटुंब उघड्यावर पडले आहे.
वाचा सविस्तर...
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याचे दुष्काळाशी दोन हात; स्वतःच खोदली ३५ फूट विहीर..!
नांदेड - जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळ शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे स्वतःचे जीवन संपविले आहे. परंतु, अर्धापूर तालुक्यातील चेनापूर गावच्या शेतकरी दाम्पत्य दुष्काळाला पुरुन उरले आहे. किशन मार्कंड असे या शेतकऱ्याचे नाव असून सालगडी ते बागायतदार शेतकरी असा त्यांचा प्रवास आहे. त्यांनी कुटुंबीयांच्या मदतीने ३५ फूट विहीर खोदून दुष्काळाशी दोन हात केले.
वाचा सविस्तर...