मुंबई : मुंबईमधील एड्स झालेल्या रुग्णांना कोरोनाच्या काळात रेल्वे प्रवासाची मुभा नसल्याने रुग्णालयात जाऊन उपचार करणे कठीण झाले होते. आजही अनेक रुग्णांना रुग्णालयात जाऊन औषधे घेणे, डॉक्तरांचा सल्ला घेता येत नाही. यावर उपाय म्हणून १ डिसेंबर या जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीने "ई निरंतर" हा डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला ( E Nirantar Digital Platform For AIDS Patients ) आहे. याचा फायदा एड्स रुग्णांना होईल अशी माहिती उप संचालक आणि अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजय कुमार करंजकर यांनी दिली.
ई निरंतर प्लॅटफॉर्म :लैंगिक असुरक्षित संबंधांमुळे मोठ्या प्रमाणात एड्स हा जीवघेणा आजरा नागरिकांना होतो. हा आजार एकाचे रक्त दुसऱ्याला चढवताना रक्तामधून तसेच इंजेक्शनची सुई एकमेकांना वापरल्यास, गरोदर मातेला एड्सची लागण झाली असल्यास तीच्या बाळाला हा आजार होऊ( How Does AIDS Occur ) शकतो. एड्स झालेल्या रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती कमी होते. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्याला आयुष्यभर उपचार आणि औषधे घ्यावी लागतात. अशा रुग्णांना महिनाभराची औषधे दिली जातात. काही रुग्ण बेडवर आहेत. त्यांना उपचार आणि औषधे घेण्यासाठी रुग्णालयात येणे शक्य होत नाही. रुग्णालयात मोठ्या रांगा असल्याने रुग्ण औषधे घेण्यास टाळाटाळ करतात. यासाठी येत्या एड्स दिनापासून ई निरंतर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे फाईल शोधण्यापेक्षा एका क्लिकवर रुग्णांची माहिती उपलब्ध होणार आहे. ज्यांना डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे किंवा डॉक्टरांची वेळ घ्यायची आहे ते सुद्धा यावरून डॉक्टरांची वेळ घेऊ शकतात असे डॉ. करंजकर यांनी ( AIDS Treatment At Home Without Queue) सांगितले.
जेलमधील कैद्यांवरही उपचार होणार :मुंबईमध्ये भायखळा आणि आर्थर रोड याठिकाणी जेल आहेत. या जेलमध्ये ड्रग्स घेणारे कैदी आहेत. जेलमध्ये बंदी असलेल्या या कैद्यांना ड्रग्स मिळत नसल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होतो. अशा कैद्यांवर उपचार करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याला जेल प्रशासन आणि इतर सरकारी यंत्रणांकडून परवानगी देण्यात आली आहे. यामुळे १ डिसेंबरपासून जेलमधील कैद्यांवरही उपचार होणार आहेत असेही डॉ. करंजकर यांनी सांगितले.