महाराष्ट्र

maharashtra

मुंबईत 29 हजारांपैकी 275 पाण्याच्या नमुन्यात ई-कोलाय, अनेक भागात दूषीत पाणी

मुंबईकरांना महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी वेळोवेळी या पाण्याचे नमुने तपासले जातात. 2020 मध्ये पाण्याचे एकूण 29 हजार 51 नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 275 नमुन्यांमध्ये ई-कोलाय विषाणू आढळून आले आहेत. त्याच बरोबर दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव आणि मुलुंड यासारख्या भागात गेल्या वर्षभरात पिण्याच्या पाण्याच्या दूषिततेत वाढ नोंदवली गेली आहे.

By

Published : Sep 18, 2021, 4:55 PM IST

Published : Sep 18, 2021, 4:55 PM IST

f
f

मुंबई- मुंबईकरांना महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी वेळोवेळी या पाण्याचे नमुने तपासले जातात. 2020 मध्ये पाण्याचे एकूण 29 हजार 51 नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 275 नमुन्यांमध्ये ई-कोलाय विषाणू आढळून आले आहेत. त्याच बरोबर दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव आणि मुलुंड यासारख्या भागात गेल्या वर्षभरात पिण्याच्या पाण्याच्या दूषितपणात वाढ नोंदवली गेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वार्षिक पर्यावरण स्थिती अहवाल (ईएसआर) 2020 मधून ही बाब समोर आली आहे.

बोलताना महापौर पेडणेकर

मुंबईतील पाणी सर्वात स्वच्छ

मुंबई महानगरपालिकेकडून सात जलाशयांमधून दीड कोटी नागरिकांना दिवसाला 3 हजार 850 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जाते. मुंबईत 4 लाखांहून अधिक पाण्याचे मीटर कनेक्शन आहे. गृहनिर्माण सोसायट्या, व्यावसायिक आस्थापना आणि झोपडपट्ट्यांना पुरवले जाते. नागरिकांना पिण्यासाठी पुरवेल जाणारे पाणी मानकांनुसार ई-कोलाय मुक्त असावे लागते. मुंबईकरांना पुरवण्यात येणारे पाणी देशात सर्वात स्वच्छ असल्याचे म्हटले जाते. मुंबईतील पाणी स्वच्छ असले तरी काही ठिकाणी पाणी गळती आणि पाण्याचे पाईपलाईन फुटल्याने गढूळ पाणी पाईपलाईनमध्ये जाऊन पाण्याची गुणवत्ता खराब होते. यासाठी पालिकेच्या प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासले जातात. मुंबई महानगरपालिकेच्या वार्षिक पर्यावरण स्थिती अहवाला (ईएसआर)मध्ये वर्षभरातील पाण्याच्या गुणवत्तेची नोंद केली जाते.

दूषित होण्याचे प्रमाण वाढले

2020 मध्ये मुंबई महापालिकेने 29 हजार 51 पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 275 नमुने म्हणजेच 0.94 टक्के नमुने दूषित आढळले आहेत. पाण्याच्या नमुन्यांमध्ये सर्वाधिक प्रदूषण 3.4 टक्के-जी-उत्तर प्रभाग (दादर, धारावी)मध्ये आढळले आहे. त्यानंतर 2.4 टक्के पी-दक्षिण (गोरेगाव), टी वॉर्ड (मुलुंड) मध्ये 2.3 टक्के आणि एफ-उत्तर (सायन, माटुंगा) मध्ये 2.2 टक्के आढळून आले आहे. 2019 मध्ये जी-उत्तरमध्ये 1.5 टक्के होते. एफ-उत्तरमध्ये ते 0.1 टक्के होते. त्याचप्रमाणे, पी-दक्षिणमध्ये ते 1.3 टक्के तर टी प्रभागात ते 0.2 टक्के होते, असे अहवालात दिसून आले. 2019 पेक्षा 2020 मध्ये पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे अहवाल म्हटले आहे. पाणी दूषित झाल्याने अतिसार आणि पेचिश सारखे आजार होऊ शकतात. दूषित पाणी खराब झालेल्या किंवा जुन्या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमुळे झाले असावे, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

त्याच ठिकाणी पाणी खराब

अनेक पाईपलाईन या गटारातून जातात. पाणीपुरवठा केला जातो तेव्हा पाईपलाईनमध्ये हवा पकडली जाते. पाईपलाईन खराब असल्यास किंवा त्याला छिद्र असल्यास पाणी पुरवठा सोडल्यावर काही काळ पाणी दूषित येते. नंतर चांगले पाणी येते. अनेक ठिकाणी गटारीतून पाईपलाईन आहे त्याठिकाणी पाणी दूषित असल्याचे प्रकार आहेत. त्याठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

हेही वाचा -उच्चांक करण्यासाठी मागील 15 ते 20 दिवसांचे लसीकरण कमी केले; नवाब मलिक यांचा मोदी सरकारवर आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details