मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान भाजीपाला, दुध व दुग्धजन्य पदार्थ, अन्नधान्य, मास्क, सॅनिटायझर तसेच जीवनावश्यक वस्तूंचा काही लोक साठे करत आहेत. साठे करून जादा दराने विक्री करत आहेत, असे लोक आढळल्यास त्यांना तुरुंगात टाकून चांगलाच बंदोबस्त करणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
'काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकणार' - दुध
सध्या राज्यात संचारबंदी सुरू आहे. याकाळात कोणीही जीवनावश्यक साधनांचा काळाबाजार केल्यास त्यांना तुरुंगात टाकण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार
माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी काही सकाळी ८ ते ११ चा वेळ निश्चित करण्यात आला आहे. यावेळी घरातील सर्वजण बाहेर न पडता, केवळ एकाने बाहेर पडून वस्तू खरेदी करावे, असे आवाहन केले. त्याचबरोबर व्हेंटीलेटरच्या संख्येबाबत चर्चा सुरू असून आणखी व्हेंटीलेटर बनविण्यासाठी चोवीस तास कसे सुरू राहील याबाबत विचार सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
हेही वाचा -'मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर मोक्का लावा'
Last Updated : Mar 24, 2020, 3:12 PM IST