मुंबई - गेल्या काही दिवसापासून मुबंईत पावसाची दाणदाण होत आहे. पावसामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. पावसाच्या पाण्यानं परिसर जलमय झाला आहे. तर दुसरीकडे याच पावसाने अनेक जीर्ण इमारती कोसळल्या आहेत. अनेक ठिकाणी भिंती पडल्या आहेत. अशा या पावसाच्या गोंधळात देखील मुंबई पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेचे कर्मचारी आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. पडत्या पावसात अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलवत आहे. अशातच एका मुंबई पोलीस कर्मचाऱ्याची कर्तव्याची तत्परत दिसून आली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे.
मुंबई पोलिसाची कर्तव्यदक्षता; पाण्यात अडकलेल्या मुलीला सुरक्षितस्थळी हलविलं
पावसाच्या गोंधळात देखील मुंबई पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेचे कर्मचारी आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. पडत्या पावसात अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलवत आहे. अशातच एका मुंबई पोलीस कर्मचाऱ्याची कर्तव्याची तत्परत दिसून आली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे.
मुंबई पोलिसाची कर्तव्यदक्षता
दरम्यान, भर पावसात एक जखमी व्यक्ती आपल्या मुलीला घेऊन पाण्यातून वाट शोधत असल्याचे पोलीस नाईक राजेंद्र शेगर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ त्यांना मदतीचा हात दिला आहे. आणि लहान मुलीला उचलून घेत, दोघांनाही सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं आहे. या संबंधित घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर प्रसारित होताना दिसत आहे. अनेकजण पोलीस नाईक राजेंद्र शेगर यांच्या कामाचं कौतुक करत त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम करत आहेत.