महाराष्ट्र

maharashtra

BKC Dasara Melava: 'गावची माणसं मुंबईला नेली, त्यांच्याच लेकरांची घराजवळची शाळा बंद केली..' बीकेसीच्या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी लावले पोस्टर्स

By

Published : Oct 6, 2022, 5:47 PM IST

शिंदे फडणवीस सरकार आल्यावर मुंबई मेट्रो 3 च्या संदर्भात शिताफीनं आणि जलद गतीने प्रकल्पाला मंजुरी दिली गेली केंद्र शासनाने देखील मंजुरी दिली. अनेक प्रकल्पाचे काम वेगाने करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस शासनाने घेतला. मात्र राज्यातील 9000 पेक्षा अधिक सरकारी शाळा जिथे 20 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. त्या बंद करण्याचा निर्णय देखील जाहीर केल्याचे नुकतेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सार्वजनिक कार्यक्रमात ( less than 20 students schools close ) सांगितले.

Remove school ban
Remove school ban

मुंबई :शिंदे फडणवीस सरकार आल्यावर मुंबई मेट्रो 3 च्या संदर्भात शिताफीनं आणि जलद गतीने प्रकल्पाला मंजुरी दिली गेली केंद्र शासनाने देखील मंजुरी दिली. अनेक प्रकल्पाचे काम वेगाने करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस शासनाने घेतला. मात्र राज्यातील 9000 पेक्षा अधिक सरकारी शाळा जिथे 20 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. त्या बंद करण्याचा निर्णय देखील जाहीर केल्याचे नुकतेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सार्वजनिक कार्यक्रमात ( less than 20 students schools close ) सांगितले.

गरीब मुलांचे नुकसान :सरकारी शाळा बंद झाल्या तर गरीब मुलांचे नुकसान ( poor children will suffer if govt schools closed ) होणार. म्हणून छात्र भारती विद्यार्थी संघटनेने आज शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या अनेक एसटीवर बसेश्वर अनोखे पोस्टर चिपकवून आंदोलन केले सरकारी शाळा बंद करू नका. तसेच जिल्हा परिषदेची मुलं लय लावतील टिळा शिंदे साहेबांना सांगा नका लावू शाळांना टिळा अशी अनोखी घोषणा शिंदे गटाच्या बसेसवर पोस्टर द्वारे चिकटवली देखील

शाळा बंदी मागे घ्या

शाळा बंदी मागे घ्या :दसरा मेळावा शिवतीर्थावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आणि बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या गटाची सभा सुरू असतानाच आज छात्र भारती विद्यार्थी संघटनेने सरकारी शाळा बंद करू नका ही मोहीम पोस्टरने राबवली शिंदे गटाच्या शेकडो बसेस वर छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा बंद करू नका. जिल्हा परिषदेची मुलं 'लय लावतील टिळा' शिंदे साहेबांना सांगा नका लावू शाळांना टाळा 'अशा आशयाची पोस्टर लावून " शाळा बंदी मागे घ्या" अशी आर्त हाक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलेली आहे.


विद्यार्थ्यांनी घोषवाक्य लिहिली :ज्या शिंदे गटासाठीच्या बसेस मुंबईच्या बीकेसीकडे आलेल्या आहेत. त्या अनेक बसेस वर छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांनी घोषवाक्य लिहिली आहे.' गावची माणसं मुंबईला नेली त्यांच्याच लेकरांची घराजवळची शाळा बंद केली 'अशी अनोखी आणि अत्यंत सुंदर घोषणा घेत ही पोस्टरबाजी केलेली आहे. या पोस्टर बाजी मधून शिंदे गटातील समर्थकांच्या मनाला सुद्धा मोहावणारी ही शाळेच्या मुलांनी केलेली घोषणा निश्चित परिणामकारक ठरणार यात काही संशय नाही.

हजारो शाळा बंद होतील : या संदर्भात छात्र भारतीचे नेते आणि विद्यार्थी रोहित ढोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की," शालेय शिक्षण मंत्र्यांनी नुकतेच जाहीर केलेले आहे. 20 पेक्षा ज्या शाळेमध्ये कमी विद्यार्थी असतील त्या शाळा बंद केल्या जाईल. हजारो शाळा या उद्या बंद होतील. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं .क्लस्टरच नाव घेऊन समायोजनच नाव घेऊन या शाळा बंद होणार. शिक्षकांची भरती करायची नाही. यासाठी हे सर्व नाटक सुरू असल्याचं हे त्यांनी नमूद केलं. असे नवीन नाव पुढे आणले जात असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. शाळा बंदीचा निर्णय मागे घ्या. आणि गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत 12 वी पर्यन्त शिक्षण द्या ''अशी मागणी छात्र भारतीच्या वतीने केली असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details