मुंबईCrimes In Mumbai : मागील काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कामकाजाची व्याप्ती वाढलेली आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत २०२३ या वर्षात सर्वात कमी गुन्ह्यांची नोंद झाली असून प्राथमिक चौकशीचे प्रमाण वाढवण्यात आले होते. आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त निशिथ मिश्रा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं की, विनाकारण कोणत्याही निष्पाप व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ नये. त्याचप्रमाणं फक्त आरोप केला म्हणून गुन्हा दाखल असे न करता सर्वात आधी प्राथमिक चौकशी करून केलेल्या आरोपींमध्ये तथ्य असेल तरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक चौकशी वाढली : १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० मध्ये ८८ प्राथमिक चौकश्या करण्यात आल्या होत्या. ५७६ केसेस तपासाधीन आहेत. तर १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ मध्ये ८८ प्राथमिक चौकश्या करण्यात आल्या असून ४९५ केसेस तपासाधीन आहेत. त्याचप्रमाणे १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ मध्ये प्राथमिक चौकशी वाढली असून त्याची संख्या १२४ इतकी आहे. तर तपास सुरु असलेल्या ३४७ प्रकरणं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
७१ गुन्हे प्रत्यक्षात नोंदवण्यात आले : २०२२ डिसेंबर मधील प्रलंबित केसेस जानेवारी २०२३ मध्ये ऍड करण्यात आल्या. त्यामुळं २०२३ या वर्षी एकूण २९४ गुन्हे नोंदणी प्रलंबित होती असून १३२ प्राथमिक चौकश्या देखील प्रलंबित होत्या. मात्र, तरी देखील जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये १७८ प्राथमिक चौकश्या करण्यात आल्या. केवळ ७१ गुन्हे प्रत्यक्षात नोंदवण्यात आल्या आहेत. २०२२ या वर्षीच्या तुलनेत २०२३ या वर्षी विनाकारण गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण घटलं आहे. २०२२ मध्ये एकूण १५८ गुन्हे नोंद करण्यात आले आहे. १९६ प्राथमिक चौकशी अहवाल तयार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्राथमिक चौकशींची संख्या :या सर्व आकडेवारीवरून हे लक्षात येते की, प्राथमिक चौकशीचा स्थर आणि संख्या वाढवल्याने प्रत्यक्षात सत्यता कळल्याने गुन्हे दाखल करण्याची गरज भासली नाही. आरोप केलेल्या व्यक्तीची सखोल प्राथमिक चौकशी केल्याने गुन्हा दाखल करायचा की नाही या निर्णयापर्यंत तपास अधिकारी पोहोचतात. नंतर वरिष्ठयांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाते. प्राथमिक चौकशी केल्याने विनाकारण गुन्हा दाखल करून वेळ वाया घालवून पोलिसांवरचा कार्यभार वाढवण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळं आम्ही प्राथमिक चौकशींची संख्या वाढवून आरोपाची शहानिशा करून गुन्हा दाखल करत असल्याची माहिती निशिथ मिश्रा यांनी दिली.
हेही वाचा -
- आयसिस दहशतवादी संघटनेच्या ७ जणांना भिवंडीतून अटक; दहशतवादी संघटनेच्या संशयितांची संख्या अकरावर
- विधानसभा हिवाळी अधिवेशन 2023 : हिवाळी अधिवेशनात 11 हजार पोलिसांचा राहणार बंदोबस्त, 100 हून अधिक मोर्चे निघणार
- Railway Minister : तीन वर्षांत महिला रेल्वे प्रवाशांवर 1000 हून अधिक गुन्हे दाखल: रेल्वेमंत्री