मुंबई -नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात आगरीपाडा येथील वायएमसीए मैदानात असदुद्दीन ओवेसी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, त्यापूर्वीच हिंदू महिला संघटन म्हणून ओळख असलेल्या 'दुर्गा वाहिनी'च्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी राडा घातला. ओवेसी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सावधगिरीने मोठा अनर्थ टळला.
मुंबईमध्ये ओवेसींच्या सभेपूर्वी 'दुर्गावाहिनी'च्या महिला कार्यकर्त्यांचा राडा - Caa and nrc protest
सीएए आणि एनआरसी विरोधात आगरीपाडा येथील वायएमसीए मैदानात खासदार असदुद्दीन ओवेसी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, दुर्गावाहिनीच्या कार्यकर्त्या महिलांनी सभेअगोदर राडा घातला.
मुंबईमध्ये ओवेसींच्या सभेपूर्वी 'दुर्गावाहिनी'च्या महिला कार्यकर्त्यांचा राडा
हेही वाचा - 'नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत शंका-कुशंका न बाळगता निश्चिंत रहा'
वायएमसीए मैदानात 'जय श्री राम' अशा घोषणा देत घुसलेल्या महिलांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले, व त्यांना आगरीपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ओवेसींचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच दुर्गा वाहिनीच्या कार्यकर्त्या महिलांनी गोंधळ घालत जय श्रीरामच्या घोषणा दिल्या व कार्यक्रम उधळून लावण्याचा केला प्रयत्न. मात्र, त्यांना मध्येच रोखण्यात पोलिसांना यश आले.