महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डंपर दुचाकीचा भीषण अपघात, ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणांची दुचाकी डंपरला धडकल्यानं तीन ठार - तिघांचा मृत्यू

Dumper Bike Accident : आज सकाळी परळच्या पुलावरुन जाताना भरधाव डंपर आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुढील तपास भोईवाडा पोलीस करत आहेत.

Dumper Bike Accident
अपघातग्रस्त वाहनं

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 16, 2024, 10:19 AM IST

Updated : Jan 16, 2024, 12:18 PM IST

मुंबई Dumper Bike Accident :आज सकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास परळ येथील दामोदर हॉल समोरील परेल ब्रिजवर दक्षिण मुंबईकडं येणाऱ्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघाता दुचाकीवरील तिघांचाही डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोराटे यांनी दिली आहे. तनिष अशोक पतंगे आणि रेणुका ताम्रकर असं अपघातात ठार झालेल्या दोघांची नावं आहेत. तर तिसऱ्या तरुणींची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याचंही यावेळी पोलिसांनी सांगितलं.

असा झाला डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात :दुचाकी क्रमांक एसएच 01 ईके 9839 वरून अशोक पतंगे आणि रेणुका ताम्रकर आणखी एक तरुणी असे तिघं जण प्रवास करत होते. हे तिघं साउथ बॉण्डनं प्रवास करत असताना त्यांच्या दुचाकीची डिव्हायडरला धडक बसली. त्यानंतर ते नॉर्थ बॉण्डनं जाणाऱ्या डंपरवर आढळून पुन्हा साउथ बॉण्डवर पडून तिघांनाही डोक्यास गंभीर दुखापत झाली. या तिघांचाही भीषण अपघात झाल्यानंतर याबाबतची माहिती डंपर चालकानं भोईवाडा पोलीस स्टेशन इथं येऊन दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.

आधार कार्डमुळे पटली ओळख :या अपघातात तनिष अशोक पतंगे, ( वय वर्षे 24 ) आणि रेणुका ताम्रकर ( वय 25 वर्ष ) या दोघांची ओळख पटली आहे. यातील अन्य एका तरुणीची ओळख पाठवण्याचं काम पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तनिष पतंगे हा अँटॉप हिल येथील पंजाबी कॉलनीमध्ये राहणारा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तनिष पतंगेच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डमुळं त्याची ओळख पटली आहे. हे तिघंही कुठून फिरून आलं होते का किंवा कुठं चालले होते, याबाबत पोलिसांना ठोस माहिती नाही. मात्र अपघातानंतर जखमींना ताबडतोब जवळच असलेल्या केईएम रुग्णालयात अॅम्बुलन्सच्या मदतीनं नेण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. हे तरुण साकीनाका परिसरात एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात शिंदे गटाची उच्च न्यायालयात धाव, जाणून घ्या काय आहे प्रकरण
  2. धारावीकरांना मिळणार साडेतीनशे चौरस फुटांची घरं; स्वतंत्र शौचालय आणि स्वयंपाकघर असणार
Last Updated : Jan 16, 2024, 12:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details