पालघर:१ आँक्टोबर २०२२ पासून झालेल्या रेल्वे वेळापत्रक बदलामूळे अनेक गाड्यांच्या वेळात बदल होऊन अनेक प्रवाशांच्या प्रवासाची घडी विस्कटली आहे. त्यातच नविन वेळापत्रकातील गाड्याही नियमितपणे वेळेवर चालवण्यात पश्चिम रेल्वेचे प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. गाड्यांच्या अनियमितते मूळे दैनंदिन प्रवाशांना रोजच्या रोज कार्यालयात उशीरा पोहचणे, तसेच गाड्यांमधील वाढलेल्या अंतरामूळे अनियंत्रित गर्दीचा सामना करावा लागत आहे. त्यातच मेल एक्सप्रेस गाड्यांना देण्यात येत असलेल्या प्राधान्यामूळे उपनगरीय गाड्यांना बाजूला काढून दैनंदिन प्रवाशांना दुय्यम दर्जाची वागणूक देण्याचे प्रकार होत आहेत.
या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने पश्चिम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा (Neeraj Verma) यांची त्यांच्या मुंबई येथिल कार्यालयात भेट घेऊन प्रवाशांचे प्रश्न अत्यंत कठोर स्वरुपात मांडले.
दैनंदीन प्रवाशांना होणाऱ्या अडचणींचा पाढा: १. कोरोना काळात बंद करण्यात आलेली डहाणू हून विरार साठी सुटणारी सकाळी ७:०५ मिनिटांची लोकल पुन्हा सुरु करण्याची मागणी करतानाच ही गाडी सुरु करण्यासाठी कोणतीही अडचण येत नसल्याचा मुद्दा शिष्टमंडळाने तयार केलेल्या अभ्यासपुर्ण वेळापत्रकासह वर्मा ह्यांच्या समोर मांडला. (problems faced by daily commuters) २. सफाळे स्थानकातील लोकशक्ती एक्सप्रेसचा थांबा रद्द केल्याने दैनंदीन प्रवाशांना होणाऱ्या अडचणींचा पाढा विभागीय व्यवस्थापकांकडे मांडताना एक तर थांबा पुर्ववत करणे किंवा सकाळी त्याच वेळेत लोकल सुरु करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. ३. नविन वेळापत्रकात झालेल्या बदलामूळे गाड्यांमधील वाढलेल्या अंतराचा फटका, परिचारीका, शिक्षक बंधू भगीनी, विद्यार्थी तसेच इतर कामगार वर्गाला बसत असल्या मुद्दा प्रखरपणे मांडत शिष्टमंडळाने गाड्यांमधील अंतर कमी करण्यासाठी वेळापत्रकच विभागीय व्यवस्थापकांना सादर करुन त्यावर सविस्तर चर्चा केली. ह्याच मुद्याच्या अनुषंगाने ३०० शिक्षकांच्या सह्यांचं निवेदन रुपाली राऊत यांनी विभागीय व्यवस्थापकांना सादर केले.