मुंबई - कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर म्हणून पोलीस विभागासह आणि इतर महत्त्वाच्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्याचा कार्यक्रम नियमीत सुरू आहे. आजपासून तिसऱ्या टप्यातील लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. मुंबईत देखील सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होणार होती. मात्र, कोविन ॲपच्या नवीन अपडेटमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने लसीकरणाला सुरुवात झाली नाही.
ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लस -
कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षापेक्षा जास्त आणि 45 ते 59 वयोगटातील गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना लस देण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार आज ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार होती. मात्र, अपडेट झालेल्या कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने लसीकरणाला सुरुवातच झाली नाही.
काय म्हणाले नोडल अधिकारी?