मुंबई -तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबईच्या उपनगरीय लोकल सेवाला बसला आहे. रेल्वे रुळावर आणि लोकलवर झाडांच्या फांद्या वेगवेगळ्या ठिकाणी कोसळण्याचा दुर्घटनेमुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील 16 लोकल फेऱ्या रद्द झाल्या. तर मध्य आणि पश्चिम मार्गावर 50पेक्षा जास्त लोकल उशिराने धावल्या आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कार्यालयात पोहचण्यासाठी लेट मार्क लागला.
लोकलचे वेळा पत्रक कोलमडले -
तौक्ते चक्रीवादळामुळे मध्य रेल्वे मार्गावर सकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडण्याची मालिका सुरू होती. ज्यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरील शिवडी-कॉटनग्रीन,घाटकोपर, डोंबिवली येथे झाड पडण्याच्या घटना घडल्या. चुनाभट्टी-जीटीबी नगर येथे ओएचइमध्ये तांत्रिक बिघाड झाला. मस्जिद येथे पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर पत्रे कोसळण्याचा घटना घडल्या आहे. परिणामी, दिवसभर लोकल सेवांचे वेळापत्रक कोलमडून पडले होते. त्यांच्या फटका अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बसला आहेत. उपनगरीय लोकलमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल धावत आहेत. यामध्ये मध्य रेल्वे मार्गावर एकूण 1 हजार 392 लोकल फेऱ्या धावतात. मात्र, आज या लोकल फेऱ्या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे.