मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर स्पाईस जेट विमानामध्ये तात्रिंक बिघाड झाला आहे. त्यामुळे १३० प्रवासी विमानतळावर तब्बल १६ तासांपासून अडकले आहेत. चिडलेल्या प्रवाशांनी याबाबत नागरी उड्डाण संचालन विभागाकडे (डीजीसीए) ट्विटरवरुन तक्रार केली आहे.
स्पाईस जेटमध्ये तांत्रिक बिघाड; गेल्या 16 तासांपासून मुंबई विमानतळावर खोळंबले 130 प्रवासी - palne
तब्बल १६ तास उलटूनही प्रवाशांना विमानात बसू न दिल्यामुळे वैतागलेल्या काही प्रवाशांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पाईस जेटची तक्रार डीजीसीएकडे केली आहे.
स्पाईस जेटचे एसजी ६३५४ हे विमान शुक्रवारी सकाळी १३० प्रवाशांना घेऊन मुंबईहून दुर्गापूरला जाणार होते. मात्र, शुक्रवारी तांत्रिक अडचणींमुळे हे विमान स्पाईस जेट कडून रद्द करण्यात आले. त्यानंतर १३० प्रवाशांना शनिवारी पुन्हा विमानतळावर बोलविण्यात आले. तब्बल १६ तास उलटूनही प्रवाशांना विमानात बसू न दिल्यामुळे वैतागलेल्या काही प्रवाशांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पाईस जेटची तक्रार डीजीसीएकडे केली आहे.
दिरंगाईबद्दल स्पाईस जेट कडून खुलासा करण्यात आला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे विमानाचे उड्डाण उशिरा होत असून लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे स्पाईस जेटने ट्विटरुन स्पष्ट केले आहे. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल स्पाईस जेटने दिलगिरी व्यक्त केली आहे.