महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोटारमनच्या प्रसंगावधनामुळे वाचले जखमी प्रवाशाचे प्राण - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

मोटारमनने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत पडलेल्या 20 वर्षीय तरुणाचे प्राण वाचले. या घटनेची मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) एस. के. जैन यांनी दखल घेतली. रेल्वे विभागाच्या वतीने मोटारमन कैलास चौधरी यांचा सत्कार केला.

रेल्वे विभागाच्या वतीने मोटारमन कैलास चौधरी यांचा सत्कार

By

Published : Sep 25, 2019, 6:21 PM IST

मुंबई -मोटारमनने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत पडलेल्या 20 वर्षीय तरुणाचे प्राण वाचले. गौतम भारती असे या जखमी तरुणाचे नाव आहे.


मोटारमन कैलास चौधरी हे मंगळवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते ठाणे लोकलवर कार्यरत होते. मंगळवारी रात्री 9 वाजून 12 मिनिटांनी सीएसएमटीहून ठाण्याच्या दिशेला जाणाऱ्या लोकलने सायन स्थानक ओलांडले. तेव्हा एक व्यक्ती जखमी अवस्थेत रुळावर पडल्याचे मोटारमन चौधरी यांच्या निदर्शनास आले.

हेही वाचा - 'चोर तो चोर वर शिरजोर', बारामती बंदवरुन दमानियांचा पवारांना टोला


त्यांनी तत्काळ आपत्कालीन ब्रेक दाबवून लोकल थांबवली. गार्ड आणि प्रवाशांच्या मदतीने त्या जखमी प्रवाशाला उचलून लोकलमध्ये घेतले. कुर्ला स्टेशनला जखमी तरूणाला तेथील कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले.
त्यानंतर जखमी प्रवाशाला सायन रुग्णालयात दाखल केले. वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे प्रवाशाचे प्राण वाचले. या घटनेची मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) एस. के. जैन यांनी दखल घेतली. रेल्वे विभागाच्या वतीने मोटारमन कैलास चौधरी यांचा सत्कार केला.

ABOUT THE AUTHOR

...view details