मुंबई-शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे. रेल्वे वाहतुकीलाही पावसाचा फटका बसला आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वेकडून अनेक गाड्या रद्द केल्या आहेत.
शनिवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम असल्याने मुंबईकरांना अडचणींचा तोंड द्यावं लागत आहे. मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे विमान वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यातच मध्य रेल्वेच्या सायन-कुर्ला दरम्यान व कल्याण ठाणे, वाशी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.