महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई मेट्रोच्या बैठक व्यवस्थेत बदल; आता शारीरिक अंतर पाळूनच प्रवास - mumbai metro corona effect

लॉकडाऊन संपल्यानंतर सार्वजनिक वाहतूक सुरू होणार का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. सार्वजनिक वाहतूक सुरू झाली तर बैठक व्यवस्था कशी असावी, यासाठी मुंबई मेट्रो सज्ज झाली आहे. पुढील काळात जरी मुंबई मेट्रोची वाहतूक सुरू झाली तरी शारीरिक अंतर पाळतच प्रवास करावा लागणार आहे.

Mumbai Metro
मुंबई मेट्रोच्या बैठक व्यवस्थेत बदल; आता शारिरीक अंतर पाळूनच प्रवास

By

Published : May 21, 2020, 7:08 PM IST

मुंबई - लॉकडाऊन संपल्यानंतर सार्वजनिक वाहतूक सुरू होणार का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. सार्वजनिक वाहतूक सुरू झाली तर बैठक व्यवस्था कशी असावी, यासाठी मुंबई मेट्रो सज्ज झाली आहे. पुढील काळात जरी मुंबई मेट्रोची वाहतूक सुरू झाली तरी शारीरिक अंतर पाळतच प्रवास करावा लागणार आहे. मात्र, ही मेट्रो सेवा कधी सुरू होणार या बाबत साशंका आहे.

लॉकडाऊन संपल्यानंतर मुंबईची 'गारेगार' प्रवासासाठी सज्ज होताना दिसत आहे. यापुढे करोनामुळे शारीरिक अंतर ठेऊन आणि इतर नियम पाळत प्रवास करावा लागणार आहे. या साठी मेट्रोकडून बसण्याच्या जागेमध्ये अंतर ठेवले जाणार आहे. बसण्याची व्यवस्था बदलण्यात येणार आहे तशी तयारी मेट्रोने सुरू केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details