मुंबई -कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानुसार येत्या रविवारी (22 मार्च) जनता कर्फ्यू होणार आहे. या दिवशी सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत सर्व सेवा बंद असणार आहेत. तेव्हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ने रविवारी मोनो सेवा बंद करण्याचाही निर्णय घेतला आहे.
कोरोना इफेक्ट: रविवारी मोनो सेवा राहणार बंद, एमएमआरडीएची घोषणा - mumbai corona update
मुंबईची मोनो रेल सेवा रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत बंद असणार आहेत. ही माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिली आहे.
कोरोना इफेक्ट: रविवारी मोनो सेवा राहणार बंद, एमएमआरडीएची घोषणा
हेही वाचा -कोरोनाचे ३ नवीन रुग्ण, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ च्या घरात
शनिवारी रात्री साडे अकरा वाजल्यापासून मोनोच्या फेऱ्या बंद होतील. सर्व मोनो गाड्या कारडेपोत लावल्या जातील. तर सोमवारी 23 मार्चला मोनो पुन्हा रूळावर येईल. सोमवारी पहाटे साडे 5 वाजता पहिली मोनो धावेल अशी माहिती एमएमआरडीएने एका पत्रकाद्वारे दिली आहे.