नवी मुंबई - कोरोना लसीकरणासाठी दुसरी ड्राय रन मोहीम राबवण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन व प्रत्येक महापालिका क्षेत्रात एक असा ड्रायरन आरोग्य संस्थेत घेण्यात येत आहे. यापूर्वी 2 जानेवारी चार ड्रायरन मोहिम राबवण्यात आली होती. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ड्रायरन घेतली जात आहे. या मोहिमेसाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे.
प्रत्येक केंद्रावर होणार 25 लाभार्थ्यांचे लसीकरण
प्रत्येक केंद्रावर 25 लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा तिसरा टप्पा यशस्वी झाला आहे. पण याआधीच भारत बायोटेकच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. आज लसीची दुसऱ्यांदा रंगीत तालीम होत आहे. तर या सर्व लसींच्या ट्रान्सपोर्टेशनलाही लवकरच सुरुवात होते आहे. सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा समावेश आहे.