कोल्हापूर - राज्यभरात कोरोना लसीकरणाचा सराव सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात चार ठिकाणी ही लस दिली जाणार आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक केंद्रात पंचवीस कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्वाना ही लस देण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. राज्यातील 30 जिल्हे आणि 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये शुक्रवारी कोरोना लसीकरणाच्या सराव मोहिमेला सुरुवात झाली. यापूर्वी 2 जानेवारीला पुणे, नंदुरबार, जालना, नागपूर या चार जिल्ह्यांत तसेच नागपूर व पिंपरी-चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात सराव मोहीम राबवण्यात आली आहे.
राज्यात आज कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा ड्रायरन; ३० जिल्ह्यात मोहीम
16:15 January 08
कोल्हापुरातही लसीकरणाचा सराव सुरू; चार केंद्रांवर काम चालू
15:36 January 08
मुंबईत कोरोना लसीकरणाचा सराव यशस्वी; वेध प्रत्यक्ष लसीकरणाचे
मुंबई- कोरोनाविरोधातील लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा आज मुंबईने यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आज मुंबईतील कूपर रुग्णालय, राजावाडी रुग्णालय आणि बीकेसी कोविड केंद्रामध्ये आज लशीची सराव फेरी यशस्वी पार पडली. त्यामुळे आता लस उपलब्ध झाल्यास प्रत्यक्षात लसीकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा पूर्णतः सज्ज आहेत, यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. लसीकरणाचा सराव यशस्वी झाल्याने मुंबईकरांना वेध लागले आहेत ते प्रत्यक्षातील लसीकरणाचे. त्यानुसार लवकरच लसीकरणाची तारीख जाहीर होईल आणि सराव फेरीप्रमाणेच लसीकरण यशस्वी करत कोरोनाला आपण हरवू, असा विश्वास यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.
12:43 January 08
अमरावतीत कोरोना लसीकरणचे ड्रायरन, जिल्ह्यात चार ठिकाणी ड्रायरन
- जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी येथील जिल्हा रुग्णलाय नर्सिंग स्कुल येथील ड्रायरनचा घेतला आढावा.
- आज ड्रायरन अंतर्गत लसीकरणाच्या वेळी काही त्रुटी अडचणी येणार नाहीत याची पाहणी करण्यात आली.
- लसीकरणास सुरुवात होताच पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना लस दिली जाणार - यशोमती ठाकूर
12:43 January 08
मुंबईतील बीकेसी येथे कोरोना ड्रायरनचा आढावा
12:32 January 08
कोरोना लसीकरणासाठी परभणीत 4 ठिकाणी पार पडली रंगीत तालीम
परभणीतील 3 ठिकाणांसह सेलू येथील रुग्णालयात यासाठीचे प्रात्येक्षिक घेण्यात आले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात स्वतः जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी उपस्थित राहून सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला
- परभणी जिल्हा रुग्णालय, सेलू येथील उपजिल्हा रुग्णालय,
- परभणी तालुक्यातील जांब प्राथमीक आरोग्य केंद्रावर
- जायकवाडी परिसरातील महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात सकाळी 11 वाजेच्या सुमारास ड्रायरन सुरू झाला
12:29 January 08
मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्र, असे होईल लसीकरण
- मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
- या ठिकाणी पालिका आणि सरकारच्या सूचनेनुसार पाच सेंटर बनवण्यात आले आहेत.
- लस घेण्यासाठी जो लाभार्थी येईल त्याला मोबाईलवर आलेला संदेश सुरक्षा रक्षक तपासतील.
- त्यांचे ओळखपत्र तपासले जाईल, त्यांना माहिती देऊन टोकन नंबर दिला जाईल.
- रुग्णांना प्रतीक्षा कक्षात बसवले जाईल. टोकन नंबर आल्यावर त्या लाभार्थीला लसीककरण कक्षात पाठवले जाईल.
- लसीकरण कक्षात ऍपवर त्या लाभार्थींची माहिती भरल्यावर त्यांना लसीकरण करणाऱ्या नर्सकडे पाठवले जाईल.
- नर्स त्या लाभार्थीला लसीकरण आणि त्यानंतर त्यांना अर्धा तास प्रतीक्षा कक्षात बसावे.
- काही त्रास झाल्यास तेथे उपलब्ध असलेल्या डॉक्टर आणि मेडिकल डॉक्टरांना माहिती देण्याच्या सूचना देण्यात येतील.
- त्यानंतर त्या लाभार्थ्यांला लस देऊन त्यांना बाहेर प्रतीक्षा कक्षात पाठवले जाईल.
12:28 January 08
महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात ड्राय रन यशस्वी, लसीकरणासाठी राजावाडी रुग्णालय सज्ज
मुंबईत महापालिकेच्या अखत्यारीतील कूपर राजावाडी रुग्णालय आणि बिकेसी जम्बो कोविड सेंटर येथे ड्रायरन घेण्यात आला. त्यापैकी राजावाडी रुग्णालयात ड्रायरन यशस्वी झाला असून येत्या लसीकरण कार्यक्रमासाठी राजावाडी रुगणलाय सज्ज असल्याची माहिती अधिक्षिका डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली.
12:10 January 08
अकोलामध्ये कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम
- अकोला जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी लसीकरणाची ड्रायरन प्रात्यक्षिक मोहीम जिल्हा स्त्री रुग्णालयांमध्ये आज सकाळी करण्यात आली.
- जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी हे प्रात्यक्षिक घेण्यात आले
- महापालिका क्षेत्रातील अशोक नगर बार्शी टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कान्हेरी सराप आरोग्य केंद्रामध्ये राबवली ही मोहीम
- जिल्हास्तरीय रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांच्यावर प्रथम प्रात्यक्षिक करण्यात आले
12:08 January 08
पालघरमध्ये कोरोना लसीकरणाचा ड्रायरन
- कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठीची रंगीत तालीम ( Dry Run ) आज पालघर जिल्ह्यात पार पडली.
- पालघर शहरातील माता बाल संगोपन केंद्र, मासवण येथील आश्रमशाळा, तसेच वसई-विरार महानगर पालिका क्षेत्रातील तीन ठिकाणी ही रंगीत तालीम घेण्यात आली.
- प्राथमिक आरोग्य केंद्रातील आणि इतर अशा पंचवीस कर्मचाऱ्यांची निवड या कुरूना लसीकरण रंगीत तालीमेसाठी करण्यात आली होती
- पालघर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 16 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे
12:06 January 08
..तर राज्य सरकार कोरोनावरील लस मोफत देण्याचा प्रयत्न करेल, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर
- कोल्हापूर-कोरोनावरील लस सर्व नागरिकांना मोफत मिळाली पाहिजे ही राज्य शासनाची भूमिका आहे. ही लस मोफत द्यावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. केंद्र सरकारने याला परवानगी नाही दिली तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निश्चितपणे लस मोफत देण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केला. ते कोल्हापुरात बोलत होते.
- कोल्हापूर जिल्ह्यात २९ हजार ५०० जणांची नोंदणी झाली आहे.
- आज जिल्ह्यात चार ठिकाणी ड्रायरन चाचणी सुरू केलीे.
- पुढच्या टप्प्यात इतर कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना कोरोनावरील लस देता शक्य होणार आहे.
12:01 January 08
अमरावती जिल्ह्यातदेखील कोरोना लसीचा ड्रायरन
- अमरावती जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी चार ठिकाणी ड्रायरन मोहीम
- अमरावती महानगरपालिका क्षेत्रात जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग स्कूल कॅम्पस व डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, तसेच ग्रामीण भागातील तिवसा येथे ड्रायरन
- अमरावती जिल्ह्यातील 100 आरोग्य कर्मचाऱ्यांनी ड्राय रन मध्ये सहभाग
- सकाळी 8 ते 11 वाजे दरम्यान ड्रायरन
- अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात अंजनगाव बारी व तिवसा येथील शासकीय रुग्णालयात ड्रायरन
11:59 January 08
रायगड जिल्ह्यातही कोविड 19 लसीकरण रंगीत तालीम सुरू
- जिल्ह्यात चार ठिकाणी रंगीत तालीम सुरू
- अलिबाग जिल्हा रुग्णालय, पेण उपजिल्हा रुग्णालय, श्रीवर्धन प्राथमिक आरोग्य केंद्र, पोयनाड आरोग्य केंद्र या चार ठिकाणी ड्रायरन
- जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रंगीत तालीमची आज जिल्हा सामान्य रुग्णालयात केली पाहणी
11:41 January 08
लातुरात कोरोना लसीकरणाच्या रंगीत तालमीला सुरुवात; पहिल्या टप्प्यात 17 हजार 500 जणांची नोंदणी
- सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत 6 जणांना प्रातिनिधिक स्वरूपात ड्राय रन करण्यात आला
- यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. सीईओ अभिनव गोयल, अधिष्ठाता लक्ष्मण देशमुख, वैद्यकीय अधिकारी सुनील डोपे यांची उपस्थिती
- नाव नोंदणीसह लसीकरण झाल्यावर संबंधित व्यक्तीला तासभर रुग्णालयातच थांबावे लागणार आहे.
11:31 January 08
वाशिम जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन सुरू...तीन ठिकाणी सुरू
- वाशिमच्या सामान्य रुग्णालयात, कारंजा उपजिल्हा रुग्णालय आणि शेलुबाजार प्राथमिक आरोग्य केंद्र अशा तीन ठिकाणी ड्रायरन
- कोरोना लसीकरणाच्या या ड्रायरन मध्ये 9 ते 12 या तीन तासात प्रत्येक सेंटर वर 25 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे
11:25 January 08
ड्राय रनची तयारी सुरू असतानाच पालकमंत्री गुलाबराव पाटील रुग्णालयात दाखल झाल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ
जळगाव जिल्ह्यात जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह शहरातील शिवाजीनगरातील महापालिका आरोग्य केंद्र, जळगाव तालुक्यातील धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत एकाचवेळी कोरोना लसीकरणाची ड्राय रन पार पडली.
11:25 January 08
- जळगावात ड्राय रनसाठी सकाळी 9 वाजेची वेळ निश्चित होती. परंतु, 9 वाजून 30 मिनिटांनी ड्राय रन सुरू
- ड्राय रनची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे स्वतः दाखल
- जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. मकर संक्रांतीनंतर लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होईल
- नागरिकांनी पाळाव्यात आरोग्य यंत्रणेच्या सूचना- पालकमंत्री गुलाबराव पाटील
11:25 January 08
ड्राय रनमध्ये मिलिंद काळे यांना मिळाली पहिली लस-
जळगावात कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनला अर्धा तास उशीर; आरोग्य यंत्रणेची ऐनवेळी धावपळ
10:37 January 08
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा ड्रायरन; प्रत्येक केंद्रावर होणार 25 लाभार्थ्यांचे लसीकरण
10:37 January 08
सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा समावेश आहे.
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा तिसरा टप्पा यशस्वी झाला आहे. पण याआधीच भारत बायोटेकच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.
10:36 January 08
पनवेलमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम सुरू
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन, व प्रत्येक महापालिका क्षेत्रात एक अशी आरोग्य संस्थेत ड्राय रन घेण्यात येत आहे. यापूर्वी २ जानेवारी चार ड्राय रन मोहिम राबवण्यात आली होती.
10:35 January 08
औरंगाबादमध्ये कोरोना लसीकरण प्रत्यक्षिकाला सकाळी दहाच्या सुमारास सुरुवात
औरंगाबाद - कोरोना लसीकरण प्रत्यक्षिकाला सकाळी दहाच्या सुमारास सुरुवात झाली.
- जिल्ह्यात तीन ठिकाणी प्रात्यक्षिक केले गेले.
- शहरात सिडको एन 11, वाळूज बाजाजनगर आणि वैजापूर या तीन ठिकाणी डेमो करण्यात आला.
- प्रत्यक्षात लसीकरण सुरू झाल्यावर कोणत्या अडचणी येऊ शकतात, त्या कशा सोडवाव्यात याबाबत आज चाचपणी होणार
- प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाल्यावर शहरातील 122 केंद्रांवर लसीकरणाची तयारी करण्यात आली आहे
- प्रत्येक केंद्रावर एक पोलीस कर्मचारी आणि 6 ते 7 कर्मचारी असणार आहे
- पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होईल त्यासाठी नोंदणी जवळपास पूर्ण झाली
10:21 January 08
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या ड्रायरनला सुरुवात
- या मोहिमेसाठी आवश्यक पूर्वतयारी महापालिकेचे कसबा बावडा येथील सेवा रुग्णालय, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, पुलाची शिरोली येथील आरोग्य केंद्र, आणि पंचगंगा हॉस्पिटल येथे सुरवात करण्यात आली आहे.
- जिल्ह्यात चार ठिकाणी ही लस दिली जाणार
- सुरवातीच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक केंद्रात पंचवीस कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे.
- जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्वाना ही लस देण्याचा अंदाज व्यक्त होत आहे
09:38 January 08
अकोला जिल्ह्यातही आज कोरोनाचा ड्रायरन
अकोला येथे चार ठिकाणी कोरोना लसीकरणाचे ड्रायरन... शहरात जिल्हा स्त्री रुग्णालय, कापशी, बार्शीटाकळी, अशोक नगर येथे ड्रायरनला सुरुवात
09:38 January 08
जळगाव कोरोना लसीकरणाच्या ड्रायरनला सुरुवात
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्याला प्रतिकात्मक लस देऊन ड्रायरनची रंगीत तालिम सुरू. सोबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागोराव चव्हाण डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांची उपस्थिती
09:20 January 08
जळगावात ड्रायरन 10 वाजेपर्यंत सुरू होण्याची शक्यता...
जळगाव - जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ड्राय रनसाठी सकाळी 9 वाजेची वेळ निश्चित होती. परंतु, अद्याप पूर्वतयारी सुरू आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी ड्रायरनसाठी नर्सिंग महाविद्यालयात दाखल होत आहेत. ड्राय रनला 10 वाजेपर्यंत सुरुवात होण्याची शक्यता.
जिल्हा शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीत ड्रायरनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, जळगावातील शिवाजीनगरातील महापालिका प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव (ता. जळगाव) आणि जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात ही ड्रायरन होणार आहे.
08:43 January 08
महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्रायरन
- मुंबई- कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेतली जात आहे. कोरोना लसीकरणाच्या या ड्रायरनचा आज दुसरा टप्पा असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्रायरन मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ३ आरोग्य संस्था व प्रत्येक महानगरपालिकेमध्ये १ आरोग्य संस्था याठिकाणी ड्रायरन घेण्यात येईल. दरम्यान भारतात सिरम आणि बायोटेक या कंपनाच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या वापरास परवानगी दिली आहे.
- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ड्राय रन घेतली जात आहे