मुंबई : ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी (Drunken Drive Cases In Mumbai) 156, रॅश ड्रायव्हिंग म्हणजेच धोकादायकपणे आणि अति वेगाने वाहन चालवणाऱ्या 66 जणांवर कारवाई करण्यात आली. हेल्मेट विना दुचाकी चालवणाऱ्या वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) कारवाईचा बडगा उचलला आहे. (New Year celebration) त्याचप्रमाणे पीपल सीट दुचाकी चालवणारा 274 जणांवर कारवाई करण्यात आली. सिग्नल तोडणाऱ्या 679 वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. (Mumbai Crime) तसेच नो एंट्री मधून वाहन चालवणाऱ्या 635 वाहन चालकांवर तर विरुद्ध दिशेने वाहन चालवणारा 238 वाहनचालकांवर तर नो पार्किंग मध्ये वाहन पार्क केलेला 3 हजार 87 जणांवर वाहतूक पोलिसांनी 31 च्या रात्री कारवाई केली आहे. (Latest news from Mumbai)
Drunken Drive Cases In Mumbai : 156 तळीरामांवर कारवाई, वाहतूक पोलिसांनी एकूण 8678 केल्या कारवाया
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी (New Year celebration) घराबाहेर पडलेल्या 156 तळीरामांवर (Drunken Drive Cases In Mumbai) मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) कारवाई केली आहे. मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून सातत्याने करण्यात येत होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. (Mumbai Crime) त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. (Latest news from Mumbai)
दारुड्यांविरुद्ध 8 हजार 678 कारवाया :त्याचप्रमाणे दुचाकी आणि चार चाकी वाहने तो करण्याच्या 362 कारवाया करण्यात आल्या. अशाप्रकारे मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने थर्टी फर्स्टच्या रात्री तळीरामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईचा बडगाच उचललेला होता. एकूण 8 हजार 678 कारवाया वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत.
100 ठिकाणी नाकेबंदी :नवीन वर्षाच्या स्वागताचे सेलिब्रेशन करण्यासाठी समुद्र किनारे, पर्यटन स्थळे, रेस्टोरंट्स, पब आदी ठिकाणी मोठी गर्दी उसळली होती. मुंबई शहर आणि उपनगरात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवळपास 100 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. अनेक ठिकाणचे मार्ग बदलण्यात आले. तर काही ठिकाणे 'नो पार्किंग झोन' तयार करण्यात आले होते.