महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Drunkards Drunk Liquor : अबब! डिसेंबर महिन्यात तळीरामांनी रिचवली सव्वा आठ कोटी लिटर दारू - Drunkards Drunk

दरवर्षी डिसेंबर महिन्यात वर्षाखेरी निमित्त होणाऱ्या विविध पार्ट्या आणि कार्यक्रमात मधून कोट्यवधीची दारू विक्री होत असते. राज्यात तळीरामांनी सरत्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सव्वा आठ कोटी लिटर दारू रिचवल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. तरीसुद्धा गतवर्षीपेक्षा काही लाख लिटर कमीच विक्री झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले आहे.

Liquor
दारू

By

Published : Jan 13, 2023, 6:41 PM IST

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाला दरवर्षी डिसेंबर महिन्यात मोठा महसूल दारू विक्रीतून मिळत असतो. दरवर्षी डिसेंबर महिन्यात नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्ट्यांमधून लाखो लिटर दारू विकली जाते यामध्ये बियर, वाईन, देशी आणि विदेशी दारू यांचा समावेश असतो. यंदा डिसेंबरमध्ये सव्वा आठ कोटी लिटर दारू विक्री झाली असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने सांगितले आहे.


सव्वा आठ कोटी लिटर दारू विक्री : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात दारू विक्री झाली. यामध्ये विदेशी मध्य 227 लाख लिटर बियर 244 लाख लिटर वाईन सव्वा 11 लाख लिटर आणि देशी दारू सर्वाधिक म्हणजे 332 लाख लिटर इतकी विकली गेली. एकूण सव्वा आठ कोटी लिटर दारू विक्री यंदा झाली, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. मात्र, ही विक्री गत वर्षापेक्षा कमी असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले आहे.

  • डिसेंबर 2021 ची मद्य विक्री : डिसेंबर 2021 मध्ये विदेशी मध्य 244 लाख लिटर बियर 232 लाख लिटर वाईन साडेदहा लाख लिटर आणि देशी दारू 343 लाख लिटर इतकी विकली गेली होती आठ कोटी 31 लाख लिटर एकूण दारू विक्री झाली होती.
  • डिसेंबर 2020 ची मद्य विक्री : डिसेंबर 2020 मध्ये विदेशी मध्य 227लाख लिटर, बियर 231 लाख लिटर वाईन साडेनऊ लाख लिटर आणि देशी दारू 341 लाख लिटर विकली गेली होती.
  • डिसेंबर 2019 ची मद्य विक्री : डिसेंबर 2019 मध्ये ही विदेशी मध्य 212 लाख लिटर बियर सर्वाधिक म्हणजे 264 लाख लिटर वाईन सव्वा आठ लाख लिटर आणि देशी दारू 324 लाख लिटर विकली गेली होती.
  • डिसेंबर 2018 ची मद्य विक्री : डिसेंबर 2018 मध्ये ही विदेशी मध्य 204 लाख लिटर बियर 27 लाख लिटर वाईन सव्वा आठ लाख लिटर आणि देशी दारू तीनशे पाच लाख लिटर विकली गेली होती. अशी माहिती ही राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details