गोरेगाव ( मुंबई ) :मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी ( Dindoshi police action ) गोरेगावच्या संतोष नगर परिसरातून एक कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केली. या प्रकरणी एका तस्कराला अंमली पदार्थांसह अटक केली ( smuggler arrested with drugs ) आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत १ कोटी ८ लाख रुपये ( Drugs worth crores seized ) आहे.
Drugs Seized in Mumbai : मुंबई पोलिसांची कामगिरी, एक कोटींचे ड्रग्ज जप्त.. एका व्यापाऱ्याला अटक - कोटयावधींचा ड्रग्ज जप्त
गोरेगावच्या संतोष नगर परिसरातून एक कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केली. या प्रकरणी एका तस्कराला अंमली पदार्थांसह अटक केली ( smuggler arrested with drugs ) आहे. पोलिसांकडून तस्करांची चौकशी सुरू आहे.
कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त : याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी रात्री पोलिस गस्त घालत असताना रत्नागिरी हॉटेलजवळ एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत दिसला, पोलिस त्याच्याकडे चौकशीसाठी पोहोचले, पोलिसांना पाहून तो पळू लागला, पोलिसांनी आरोपीला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याजवळील बॅगमधून २७० ग्रॅम हेरॉईनचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत १ कोटी ८ लाख रुपये आहे.
तस्करांची चौकशी सुरू :आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून तस्करांची चौकशी सुरू आहे.