मुंबई Drug Smuggling In Mumbai : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका महिलेकडून 13 कोटीचं कोकेन जप्त करण्यात आलं. ही महिला कोटे डी'आयव्होअर या देशातून मुंबईत आली होती. मात्र मुंबई विमानतळावरील डीआरआयच्या अधिकाऱ्यांना संशय आल्यानं या महिलेची झाडाझडती घेतली. यावेळी महिलेकडं 1273 ग्रॅम कोकन असल्याचं आढळून आलं.
हँडबॅगमध्ये आढळून आलं कोकेन :मुंबई विमानतळावर आलेल्या कोटे डी'आयव्होअर या देशातील महिलेकडं ड्रग्ज असल्याचा संशय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील डीआरआयच्या अधिकाऱ्यांना आला होता. त्यांनी या महिलेची झाडाझती घेतली असता, अगोदर काहीही आढळून आलं नसल्यानं अधिकारी चक्रावून गेले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कसून तपास केला असता, महिलेनं हँडबॅमध्ये ड्रग्ज लपवून ठेवल्याचं आढळून आलं.
हँडबॅगच्या आतील बाजुला लपवलं कोकेन :डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी महिलेच्या हँडबॅगची तपासणी केली असता, त्यातील आतील बाजुला क्लचमध्ये कोकेन लपवल्याचं उघड झालं. हँडबॅगच्या आतील बाजुला तब्बल 1273 ग्रॅम कोकेन या महिलेनं लपवल्याचं स्पष्ट झाल्यानं डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी या महिलेला ताब्यात घेतलं. डीआरआयनं या महिलेकडून कोकेन जप्त केलं आहे. या जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत तब्बल 13 कोटी रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
न्यायालयानं ठोठावली कोठडी :मुंबई विमानतळावर आलेल्या कोटे डी'आयव्होअर या देशातील महिला ड्रग्ज तस्कराकडून डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी 13 कोटीचं कोकेन जप्त केलं. या महिलेला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी 21 डिसेंबरला मुंबई विमानतळावर पकडलं होतं. कोकेन पकडल्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी या महिलेला न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयानं या महिलेला न्यायालयीन कोठडी ठोठावल्याचं वृत्तसंस्थेनं दिली आहे.
हेही वाचा :
- Home Drug Factory : नायजेरियन व्यक्ती घरात चालवत होता ड्रगचा कारखाना, १० कोटींचं घबाड जप्त
- चहापत्तीच्या नावावर अमली पदार्थाची तस्करी, येमेनी नागरिकाला एनसीबीकडून अटक
- स्टील फर्निचरमधून पाठवले ड्रग्स; इंडो ऑस्ट्रेलियन ड्रग्ज सिंडिकेटचा मुंबई एनसीबीने केला पर्दाफाश