मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रेल्वे प्रोटेक्शन फोर्सकडून करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान एका अमली पदार्थ तस्कर महिलेला अटक करण्यात आली आहे. यावेळी तिच्या ताब्यातून ६५ हजार रुपये किमतीचे ६.५ ग्राम एमडी हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. आरपीएफला मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईदरम्यान आरपीएफ, जीआरपी व अमली पदार्थविरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटचा सहभाग आहे.
सीएसएमटी स्थानकावर अमली पदार्थ तस्कर महिलेला अटक
२७ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मुंबई हावडा मेलमध्ये एक संशयित महिला वावरताना पोलिसांच्या निदर्शनास आली. यानंतर या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिच्या ताब्यातून एमडी हे अमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत. अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव काजल मंडल सुमोंतो असे असून ती नालासोपारा येथील रहिवासी आहे.

हेही वाचा - छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीपटू सुशिलचा सागरला मारहाण करतांनाचा व्हिडिओ व्हायरल