महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्हाट्सअ‌ॅपच्या माध्यमातून गांजा विकणाऱ्यांना पोलिसांनी केले जेरबंद - Sunil Raj Devdas

अटक केलेले आरोपी हे मुंबई उपनगरातील विविध महाविद्यालयांच्या बाहेर उभे राहून व्हाट्सअ‌ॅप ग्रुपच्या माध्यमातून गांजा सारखे अमलीपदार्थ विकायचे. गेल्या काही महिन्यांपासून ते हे काम करीत होते. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या बांद्रा युनिटला मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

अटक केलेला आरोपी

By

Published : Aug 29, 2019, 7:00 PM IST

Updated : Aug 29, 2019, 7:25 PM IST

मुंबई- उपनगरातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना व्हाट्सअ‌ॅप ग्रुपच्या माध्यमातून गांजासारखे अमली पदार्थ विकणाऱ्या २ आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या पथकाच्या बांद्रा युनिटला मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी माहिती देताना डीसीपी अशोक प्रणय

अटक केलेले आरोपी हे मुंबई उपनगरातील विविध महाविद्यालयांच्या बाहेर उभे राहून व्हाट्सअ‌ॅप ग्रुपच्या माध्यमातून गांजासारखे अमली पदार्थ विकायचे. गेल्या काही महिन्यांपासून ते हे काम करत होते. याप्रकरणी पोलिसांनी सुनील राज देवदास (२९) या आरोपीला शहरातील जुहू तारा रोड येथून १ लाख ८० हजार रुपयांच्या ९ किलो गांजासह अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीच्या चौकशी दरम्यान शहरातील वाडीबंदर येथून अरमान शॉकत शेख या आरोपीला ३ लाख २० हजार रुपयांच्या १६ किलो गांजासह अटक केली आहे. दरम्यान, याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे बांद्रा युनिट अधिक तपास करीत आहे.

Last Updated : Aug 29, 2019, 7:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details