मुंबई: गोरेगाव पूर्व येथे संतोष नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयासमोर कारवाई करण्यात आली. ही कारवाई 23 फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास करण्यात आली. शमसुद्दी उर्फ अज्यु मोहमद शेख, वय ४३ असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. शमसुद्दी उर्फ अज्यु मोहमद शेख, वय ४३ आरोपी गोरेगाव पूर्व परिसरातील दिंडोशी येथे राहतो.
ड्रग्जची किंमत दहा लाख: मुंबई शहरामध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याबाबत वरिष्ठांच्या प्राप्त सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने 23 फेब्रुवारीला कक्ष ११ चे पोलीस निरीक्षक सचिन गवस यांच्या पर्यवेक्षखाली कक्षातील पोलीस निरीक्षक भरत धोणे व पथक हे कक्ष ११ व आजूबाजूचे परिसरात अंमली पदार्थ विक्री करणारे तस्करांच्या शोधात पेट्रोलिंग करीत होते. पोलीस उपनिरीक्षक अजित कानगुडे यांना सार्वजनिक शौचालयासमोर, न्यू नवाज विकल शॉप, बीएमसी वॉर्ड, संतोष नगर, दिंडोशी, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे एक संशयित इसम त्याचे अस्तित्व लपवित संशयास्पद रित्या फिरताना आढळून आला. याप्रकरणी त्यांनी सोबत असलेल्या पथकाच्या मदतीने त्यास ताब्यात घेवून २ पंचांच्या उपस्थितीत त्याची वैयक्तिक झडती घेतली. संशयित इसमाच्या झडतीत ५२ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन ) हस्तगत करण्यात आले. या ड्रग्जची किंमत दहा लाख 40 हजार इतकी आहे. तसेच दोन मोबाईल जप्त करण्यात आले