मुंबई : चिंचपोकळी परिसरातील (Chinchpokali area) आर्थर रोड कारागृहात 134 ग्रॅम चरस, अर्धा डझनहून अधिक ड्रग्जच्या गोळ्या सापडल्या (Drug found in Arthur Road Jail) आहेत. हे ड्रग्ज बॅरेक 11 जवळ सापडली, जिथे हाय-प्रोफाइल कैदी राहतात. याप्रकरणी एन एम जोशी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल (case registered against unknown person) करण्यात आला असून; तपास सुरू आहे.
अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल : आर्थर रोड तुरुंगातील एका हवालदाराने, चरस आणि अन्य ड्रग्जच्या गोळ्या असलेली पॉलिथिन पिशवी कारागृहाबाहेरून कारागृहात फेकल्याच्या आरोपावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध एन एम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बॅरेक क्रमांक 11 जवळ ही बॅग सापडली, ज्यामध्ये संवेदनशील प्रकरणांमध्ये अंडरट्रायल कैदी आहे. एन एम जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून; पुढील तपास सुरू केला आहे.
गोळ्या ड्रग्जच्या असल्याचा संशय : पोलीस कॉन्स्टेबल अजय धुरी यांनी सांगितले की, त्यांनी 29 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी कारागृहात काम करायला सांगितले होते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4.30 च्या सुमारास त्यांना ही ड्रग्ज असलेली बॅग सापडली. त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली आणि बॅग उघडण्यात आली. त्यावेळी त्यात 134 ग्रॅम चरस आणि अर्धा डझनहून अधिक पांढऱ्या रंगाच्या गोळ्या असल्याच्या आढळल्या होत्या, त्या गोळ्या ड्रग्जच्या असल्याचा संशय आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासणार : बॅग सापडलेल्या ठिकाणाजवळ तळमजला आणि दुमजली इमारत आहे, जिथे हाय-प्रोफाइल कैद्यांना ठेवण्यात आले आहे. हे अंमली पदार्थ बाहेरून फेकण्यात आले होते आणि तपास सुरू झाला आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही पिशवी फेकण्यामागे कोण आहे, हे शोधण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहेत. जप्त करण्यात आलेले ड्रग्स पुढील तपासणीसाठी पाठवली जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एन एम जोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चांद्रमोरे यांना संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.