मुंबई - सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात पुढे आलेला ड्रग्जचा अँगलदेखील तपासला जात आहे. या तपासाची जबाबदारी आयआरएस म्हणजेच इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस खात्यातील एका मराठी अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहे. या मराठी अधिकाऱ्याचे नाव समीर वानखेडे आहे. समीर हे मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे पती आहेत.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सध्या तीन केंद्रीय तपास यंत्रणा करत आहेत. यातील एक असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) युनिट समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. या प्रकरणाच्या तपासाची सूत्रं हातात आल्यानंतर त्यांनी वेगाने तपास पुढे नेला. या प्रकरणात दोन ड्रग्ज पेडलर्स आणि रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना त्यांनी अटक करून आज (शनिवारी) न्यायालयासमोर हजर केले. त्यांना ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे.
हेही वाचा -सुशांतसिंह प्रकरण : शोविक चक्रवर्तीला अमली पदार्थ पुरवणाऱ्या कैजाण इब्राहिमची जामिनावर सुटका