महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा; सेनेची राज्यपालांकडे मागणी - महाराष्ट्र सत्ता स्थापन

शिवसेनेच्या शिष्ट मंडळाने आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यामध्ये महाराष्ट्र दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे

By

Published : Oct 31, 2019, 8:23 PM IST

मुंबई - शेतकरी, फळ बागायतदार, शेतमजूर, मच्छिमार, पशुपालन, अशा सर्वांना शासनाच्या वतीने सध्या तातडीच्या मदतीची गरज आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतीचे तसेच मच्छीमारांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागात जाऊन जनतेला दिलासा देण्याचे आम्ही ठरवले आहे, असे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा - खड्डे दाखवा पैसे कमवा, पालिकेची नवी योजना; पालिका प्रशासन फेल झाल्याचा विरोधकांचा आरोप

तसेच शिवसेनेच्या शिष्ट मंडळाने आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यामध्ये महाराष्ट्र दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना सत्तेत असून देखील मुख्यमंत्र्यांकडे न जाता त्यांनी राज्यपालांची भेट घेत, ओला दुष्काळ जाहीर करावा करावा, अशी मागणी केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत.

हेही वाचा - शिवसेना 'घालीन लोटांगण' करीत सत्तेत सहभागी होणार - नरेंद्र वाबळे

तर सत्ता स्थापनेबाबत शिवसेना कधी दावा करणार? याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारला असता, याबाबत सर्व निर्णय आमदारांनी, नेत्यांनी पक्षप्रमुखांकडे सोपवले आहेत. त्यामुळे पक्षप्रमुख जो निर्णय घेतील, तो निर्णय अंतिम असेल, असेही शिंदे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details