महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Million fines on motorists : मुजोर वाहन चालकांची नोटीसांना केराची टोपली; एक हजार कोटींचा दंड थकवला! - वाहतूक नियमांचे उल्लंघन

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर दंड आकारलेल्या वाहन चालकांची मुजोरी (Driver negligence) वाढत आहे. वाहतूक विभागाने 96 लाख वाहनधारकांना दंड भरण्यासाठी लोक अदालतीच्या नोटीस पाठवल्या. मात्र, एक हजार कोटी रुपयांच्या थकीत (A fine of Rs 1,000 crore has not been paid) दंडा पैकी केवळ 17 कोटींचा दंड वसूल झाला. वाहतूक विभागाच्या ई चलानसह लोक अदालतीच्या नोटीसांनाही वाहनचालकांनी केराची टोपली दाखवली आहे.

A fine not paid
दंड थकवला

By

Published : Apr 27, 2022, 10:06 AM IST

मुंबई:राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन (Violation of traffic rules) करणाऱ्या चालक व मालकांची वाहने न अडवता वाहतूक पोलीस, आरटीओ आणि पोलीस प्रशासनाकडून वाहन चालकांच्या गाडीचा क्रमांकाचे छायाचित्र काढुन वाहन चालकांना दंडाची माहिती मोबाईलवर संदेशद्वारे पाठविली जाते. वाहन चालकांना हा दंड पोलिसांच्या संकेतस्थळावर तसेच पोलिसांकडे डेबिट कार्डद्वारे भरता येतो. मात्र बहुतांश वाहन चालक ई-चलनाची रक्कम भरत नाही. हे सातत्याने पहायला मिळत आहे.

थकीत असलेल्या दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून लोक अदालतीची नोटीस पाठवण्यात येत असते. 7 मे 2022 रोजी राज्यातील सर्व न्यायालयामध्ये लोक अदालतींचे आयोजन करण्यात आले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या तब्बल 96 लाख 867 वाहनांना नोटीस पाठवण्यात आल्या आहे. या सर्व वाहनांवर वाहतूक विभागाच्या 1हजार 90 कोटी रुपयांच्या दंडाची वसुली प्रलंबित आहे. हीच दंड वसुली करण्यासाठी वाहतूक विभागाने लोक अदालतची मदत घेतली. आतापर्यंत पाठवलेल्या नोटिसांच्या माध्यमातून राज्यातील 3 लाख 44 हजार 866 ई चलान निकाली निघाले आहेत. त्या ई- चलानच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत 17 कोटी 58 लाख 26 हजार 600 रुपयांचा दंड जमा झाला आहे.

हेही वाचा : Phone Taping Case : रश्मी शुक्ला यांच्याविरोधात 700 पानांचे आरोपपत्र दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details