मुंबई- शहर पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या रात्री मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या तब्बल ७७८ वाहन चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री मुंबई पोलिसांकडून शहरातील विविध परिसरामध्ये जवळपास शंभर ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी शहरातील तब्बल ५,३३८ वाहन चालकांची तपासणी केली. यामध्ये तब्बल ७७८ वाहन चालक मद्य पिऊन वाहन चालवताना आढळून आले. तेव्हा पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत 31 डिसेंबर 2019 ला मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांच्या संख्येत वाढ - drink and drive fine in mumbai on 31 december 2019
२०१८ च्या ३१ डिसेंबरशी तुलना केल्यास २०१९ मध्ये मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्याच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली. ३१ डिसेंबर २०१८ ला ४३३ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती.

मुंबई शहरात कारवाई करण्यात आलेल्या ७७८ मद्यपी वाहन चालकांमध्ये, ५७८ दुचाकी वाहन चालक आहेत. तर राहिलेले दोनशे चारचाकी वाहन चालकांचा यात समावेश आहे. मुंबईतील कुलाबा (१२) , काळबादेवी( १७) , मलबार हिल( २४) , भायखळा ( २४) , माटुंगा ( २४)ट्रॉम्बे( १८) , मानखुर्द ( २६), व घाटकोपर (२७), सहार (३५), दहिसर (५८) या ठिकाणी सर्वाधिक गुन्हे नोंदवण्यात आले.
दरम्यान, २०१८ च्या ३१ डिसेंबरशी तुलना केल्यास २०१९ मध्ये मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्याच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली. ३१ डिसेंबर २०१८ ला ४३३ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती. मुंबई पोलिसांकडून दर दिवशी ड्रंक अँड ड्राइव्हच्या संदर्भात नाकाबंदीद्वारे कारवाई केली जाते. मात्र पोलिसांच्या कारवाईनंतरही मद्यपी चालकांवर याचा कुठलाही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे.
TAGGED:
drunk and drive