महाराष्ट्र

maharashtra

न्हावा शेवा बंदरात डीआरआयने केली मोठी कारवाई, १० कोटींच्या विदेशी सिगारेट्स जप्त

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 6:36 AM IST

Foreign Cigarettes Seized: गुप्तचर महसूल संचालनालयाने (डीआरआय) मुंबईच्या न्हावा शेवा बंदरात परदेशी सिगारेट्स मोठ्या प्रमाणावर जप्त केल्या आहेत. (Nhava Shewa Port) हा साठा जवळपास 10 कोटी ८ लाख रुपयांचा आहे. डीआरआयचे अधिकारी प्रवीण जिंदल यांनी याविषयी माहिती दिली आहे. (DRI Action) दोन कंटेनरमधून हा माल बंदरात आणल्या गेला होता. (Intelligence Revenue Directorate)

Foreign Cigarettes Seized
विदेशी सिगारेटची पाकिटं जप्त

मुंबईForeign Cigarettes Seized:गुप्तचर महसूल संचालनालयाने (डीआरआय) तस्करीविरोधात मोठी कारवाई करत न्हावा शेवा बंदरात 10.08 कोटी किमतीच्या विदेशी सिगारेटचा कंटेनर जप्त केला. गुप्तचर महसूल संचालनालयाच्या मुंबई झोनल युनिटने ‘चायनीज व्हिस्कोस वुवन कार्पेट’ म्हणून पाठवलेल्या मालाआड विदेशी सिगारेट असलेला कंटेनर जप्त केला आहे. 10 कोटी 8 लाख रुपयांच्या 67 लाख 20 हजार सिगारेटच्या काठ्या जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती डीआरआयचे अधिकारी प्रवीण जिंदल यांनी दिली आहे. (Container of Foreign Cigarettes)

विदेशी ब्रॅंडच्या सिगारेटींनी भरलेला कंटेनर जप्त:"चायनीज व्हिस्कोज वुवन कार्पेट" म्हणून जाहीर केलेल्या मालामध्ये लपवून सिगारेटची तस्करी केली जात असल्याच्या विशिष्ट गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई झोनल युनिटच्या अधिकार्‍यांनी जेबेल अली बंदर, UAE येथून न्हावा शेवा बंदरात पाठवलेले दोन कंटेनर रोखले. पहिल्या कंटेनरची सविस्तर तपासणी केली असता ते पूर्णपणे विदेशी ब्रँडच्या एसे चेंज (मेड इन कोरिया) सिगारेटने भरलेले असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे दुसऱ्या कंटेनरमध्ये जुन्या आणि वापरलेल्या कार्पेटचे 325 रोल होते. या कार्पेटचा वापर तस्करांनी कव्हर कार्गो म्हणून आणि कस्टम अधिकाऱ्यांना फसवण्यासाठी केला होता.

सिगारेटची किंमत 10 कोटींपेक्षा जास्त:डीआरआयच्या अधिकाऱ्यांना तपासात सिगारेटच्या एकूण 67 लाख 20 हजार काठ्या लपवून ठेवलेल्या आढळल्या. तसेच त्या सिगारेटच्या काठ्या जुन्या आणि वापरलेल्या कार्पेट्ससह सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या सिगारेटची किंमत अंदाजे 10 कोटी 8 लाख असून पुढील तपास सुरू आहे. अशा प्रकारे डीआरआयने केलेल्या जप्तीवरून तस्करी विरोधी आदेश आणि अशा कारवायांमध्ये गुंतलेल्या सिंडिकेट विरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचा संकल्प दर्शवत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

४० कोटींचा कोकेन केला होता जप्त: अलीकडे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नेतृत्त्वात केलेल्या महत्त्वपूर्ण कारवाईत कोकेन तस्करीच्या आरोपाखाली शुक्रवारी मुंबई विमानतळावर 21 वर्षीय थाई नागरिकाला पकडण्यात आले. डीआरआयने विश्वसनीय माहितीच्या आधारे कारवाई करत महिलेला अदिस अबाबाहून आल्यावर तिला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले. तिच्या ट्रॉली बॅगची बारकाईने तपासणी केली असता पांढर्‍या पावडरसारखा पदार्थ असलेली अनेक पॅकेट उघडकीस आली. त्यानंतरच्या चाचणीत हा पदार्थ कोकेन असल्याची पुष्टी झाली, ज्याचे अंदाजे आंतरराष्ट्रीय बाजार मूल्य 40 कोटी इतके आहे.

हेही वाचा:

  1. हवाई दलाच्या कसरतींनी जिंकले मुंबईकरांचे मन; 'एअर शो' पाहण्यासाठी मरीन ड्राईव्हवर नागरिकांची गर्दी
  2. अखेर 'हात' सोडला! एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मिलिंद देवरांचा शिवसेनेत प्रवेश
  3. मिलिंद देवरांच्या राजीनाम्याबाबत काँग्रेसचा थेट पंतप्रधान मोदींवर आरोप, 'हा' केला मोठा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details