मुंबईGold Smuggling Case Mumbai : डीआरआयने पुणे मॅजिक बसमधून पाच किलो सोन्याची बिस्किटे घेऊन जाणारे दोन सोने तस्करांना अटक (Two Gold Smugglers Arrested) केली आहे. डिआरआयच्या ऑल इंडिया कारवाईत मुंबईतून 3 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 8.5 कोटी रुपयांचे सोने जप्त (Gold Smugglers seized) करण्यात आले आहे. डीआरआयने अनेक ठिकाणी केलेल्या कारवाईत सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटच्या आणखी एका टोळीचा पर्दाफाश केला आहे.
8.5 कोटी रुपयांचे सोने जप्त: डीआरआय मुंबई, गोवा प्रादेशिक युनिट आणि वाराणसी पथकांच्या संयुक्त कारवाईमुळे एकूण 13.7 किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले आहे. 8.5 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी ३ जणांना मुंबईत तर २ जणांना वाराणसीत अटक करण्यात आली आहे. या कारवाईअंतर्गत 14 ऑक्टोबरला डीआरआयने 31.7 किलो सोने जप्त केले होते. DRI ने त्याच सिंडिकेटच्या दुसर्या टोळीचा पर्दाफाश केला, जी टोळी रेल्वे मार्गाने सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होती.