मुंबई - नायर रुग्णालयात डॉ. पायल तडवी यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती महिरे, डॉ. अंकिता खंडेलवाल या महिला आरोपींच्या जामीन अर्जावर मुंबईतील सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होता. यावर सुनावणी घेत सत्र न्यायालयाने ही जामीन याचिका फेटाळून लावली आहे.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपींचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला - जामीन अर्ज
नायर रुग्णालयात डॉ. पायल तडवी यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन महिला आरोपी डॉक्टरांच्या जामीन अर्जावर मुंबईतील सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होता. यावर सुनावणी घेत सत्र न्यायालयाने ही जामीन याचिका फेटाळून लावली आहे.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या जामीन अर्जाला शुक्रवारी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून युक्तिवाद करताना, या प्रकरणाचा तपास अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यात असल्याने सद्य परिस्थितीत आरोपींना जामीन देणे योग्य ठरणार नाही असे म्हटले होते. मात्र, अटक करण्यात आलेल्या आरोपी ह्या महिला असून या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हायला हवा, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला.
बचाव पक्षाच्या वकिलांच्या या युक्तीवादावर बोलताना आरोपी या महिला डॉक्टर आहेत. त्यांचे करीयर पणाला लागत आहे. तर दुसरीकडे आत्महत्या करणारी महिलादेखील डॉक्टर होती. तिनंही आपला जीव गमावला आहे, हे ही विसरून चालणार नाही. अजामिनपात्र गुन्ह्यात आरोपी आपल्या मूलभूत अधिकारांविषयी बोलू शकत नाहीत, असे सरकारी वकील राजा ठाकरे यांनी म्हटले होते.