महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : पायलच्या मोबाईलमधील डिलीट डाटा फॉरेन्सिक टीमने मिळविला

ज्या दिवशी डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली त्या दिवशी आरोपी महिला डॉक्टरांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचे तपासात समोर आले आहे.

डॉ पायल तडवी

By

Published : Jul 6, 2019, 9:55 AM IST

मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आणखी एक नवा खुलासा समोर आला आहे. डॉ पायल तडवी यांच्या मोबाईलमधून आरोपी महिलांनी डिलीट केलेला डाटा फॉरेन्सिक टीमने परत मिळविला आहे. या सुसाईड नोटमध्ये डॉ. पायल तडवी यांनी तिन्ही आरोपी डॉक्टरांची नावे लिहिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तक्रारदार पक्षाचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांनी पायल तडवीने आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट नष्ट केली असल्याचा दावा केला आहे.

डॉ पायल तडवी

ज्या दिवशी डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली, त्यादिवशी आरोपी महिला डॉक्टरांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही तपासात समोर आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत आहे. या आठवड्यात ते या प्रकरणाचा तपास पूर्ण करणार आहेत. डॉ. पायल तडवीचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आरोपी डॉ. महिलांवर पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आरोपी हेमा अहुजा, अंकिता खंडेलवाल, भक्ती महिरे यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झालेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details