मुंबई - आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती साजरी होत आहे. मुंबईतील कलाकार चेतन राऊत यांनी अनोख्या कलाकृतीच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. चेतन यांनी पुशपिनच्या माध्यमातून बाबासाहेबांचे पोर्ट्रेट तयार केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष: पुश पिनच्या सहाय्याने साकारली कलाकृती
लॉकडाऊनमूळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साजरी करण्यात येत आहे. मुंबईतील कलाकार चेतन राऊत यांनी अनोख्या कलाकृतीच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. चेतन यांनी पुशपिनच्या माध्यमातून बाबासाहेबांचे पोर्ट्रेट तयार केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोर्ट्रेट
लॉकडाऊनमूळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साजरी करण्यात येत आहे. यामुळे आंबेडकर अनुयायांनी जयंती साजरी करण्यासाठी सोशल मीडिया हे माध्यम निवडले आहे. राऊत यांनी ६ रंगछटा असलेल्या 4 हजार 266 पुश पिनचा वापर करून पोर्ट्रेट साकारले आहे. 24 इंच लांब आणि 30 इंच रुंद असे हे पोर्ट्रेट आहे.