मुंबई : संपूर्ण भातरभर आज भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरी होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही पालिकेने चैत्यभूमी आणि निवासस्थान असलेल्या राजगृह येथे नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, आरोग्य सुविधा, क्लोज सर्कीट टिव्ही, चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी आणि अग्निशमन व नियंत्रण कक्ष इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यपाल आदींनी जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
चैत्यभूमी परिसरात आकर्षक सुशोभिकरण :चैत्यभूमी स्तूप व रेलिंग याला रंगरंगोटी करण्यात आली आहे. स्तूपाची विविध रंगांच्या फुलांनी सजावट केली जात आहे. उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. चैत्यभूमी येथील तोरणा गेट आणि अशोक स्तंभाची रंगरंगोटी आणि सुशोभीकरणही करण्यात आले आहे. भीमज्योतीला सुंदर फुलांची सजावट करण्यात आली आहे. त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मृती व्हिवींग डेकला देखील सजवण्यात आले आहे.