महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विक्रोळी पार्क साईटवर आंबेडकर जयंती उत्साहात साजरी, मिरवणुकीत वेगवगेळ्या सामाजिक रथांचे आकर्षण - birth anniverssary

बाबासाहेंबाच्या या मिरवणुकीत वेगवेगळ्या सामाजिक रथांचाही समावेश होता. विक्रोळी पार्क साईट येथील सम्राट अशोक सांस्कृतिक मंडळातर्फे जांभळी नाका पार्क साईट येथे ही मिरवणूक काढण्यात आली होती. यात मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष सहभागी झाले होते.

विक्रोळी पार्क साईटवर आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

By

Published : Apr 15, 2019, 8:30 AM IST

मुंबई -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती महोत्सव समितीतर्फे मुंबईतील विक्रोळी विभागात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विक्रोळी पार्क साईट निळ्या रंगात रंगून गेली होती.
बाबासाहेंबाच्या या मिरवणुकीत वेगवेगळ्या सामाजिक रथांचाही समावेश होता. विक्रोळी पार्क साईट येथील सम्राट अशोक सांस्कृतिक मंडळातर्फे जांभळी नाका पार्क साईट येथे ही मिरवणूक काढण्यात आली होती. यात मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष सहभागी झाले होते.

विक्रोळी पार्क साईटवर आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
महिला सशक्तीकरणाचाही संदेश या मिरवणुकीतून देण्यात आला. महिलांनी सावित्रीबाई फुले, रमाबाई, लक्ष्मीबाई, इतर सामाजिक महिलांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. तसेच, बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथ संपदाचा एक चित्ररथ काढण्यात आला होता. मोठ्या जल्लोषात बाबासाहेंबाची जयंती यावेळी साजरी करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details