मुंबई -गणेशोत्सव काळात लालबाग जवळील भारत माता चौक ते बावला कम्पाऊंडपर्यंतचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे. त्यामुळे, पर्यायी मार्गांची व्यवस्था वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे.
गणेशोत्सव काळात मुंबईतील 'हा' रस्ता राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग - लालबाग जवळील आंबेडकर मार्ग बंद
गणेशोत्सव काळात लालबाग जवळील भारत माता चौक ते बावला कम्पाऊंडपर्यंतचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे. त्यामुळे, पर्यायी मार्गांची व्यवस्था वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे.
गणेशोत्सव काळात आंबेडकर मार्ग बंद असल्याने पर्यायी इतर छोटे मार्ग रोज दुपारी तीन ते सकाळी सात या काळात सुरू राहणार आहेत. यामध्ये, भारत माता ते करी रोड जंक्शन ब्रिज आणि डाव्या बाजूने शिंगेट मास्टर चौक ते एनएम जोशी मार्ग आणि आर्थर रोड ते येस ब्रिज या मार्गांचा समावेश आहे.
तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून गॅस कंपनी चौकातून साने गुरुजी मार्गावर उजवीकडे जाणारा, चिंचपोकळी रेल्वे उड्डाणपुलावरून साने गुरुजी मार्गाने गॅस कंपनी चौकातून उजवीकडे जाणारा, चिंचपोकळी पुलावरून साने गुरुजी मार्गाकडे येणारा, एसएस राव मार्गावरील नाईक चौक ते लालबाग पोलीस चौकीपर्यंत जाणारा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हॉटेल रिजॉईस चौक ते श्रावण यशवंते चौकापर्यंत जाणाऱ्या मार्गांची वाहतून नेहमीप्रमाणेच राहणार आहे. दरम्यान, आंबेडकर मार्ग बंद असल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.