मुंबई- राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. पूरपरिस्थितीमुळे निवासी भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यात मोठे नुकसान होत आहे. त्यासाठी शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाते. मात्र, आता नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
नैसर्गिक आपत्तीमध्ये 2 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी घर पाण्यात बुडाले असल्यास, घर पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा घरांचे पूर्णत: नुकसान झाले असल्यास कपडे, भांडी, घरगुती वस्तुंसाठी शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाते. अशा प्रकारच्या नुकसानीसाठी शासनाकडून प्रति कुटुंब 5 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. या अर्थसहाय्याच्या रक्कमेत 2019 या वर्षासाठी शासनाकडून भरीव वाढ करण्यात आली आहे.
पुरामुळे नुकसान झाल्यास मिळणाऱ्या भरपाईत दुप्पटीने वाढ, शासन निर्णय जारी
राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. पूरपरिस्थितीमुळे निवासी भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यात मोठे नुकसान होत आहे. त्यासाठी शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाते. मात्र, आता नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे मिळणाऱ्या भरपाईत दुप्पट वाढ
याअंतर्गत ग्रामीण भागासाठी 10 हजार रुपये प्रति कुटुंब व शहरी भागासाठी 15 हजार रुपये प्रति कुटुंब मदत म्हणून देण्यात येणार आहे. यावर्षी 26 जुलै 2019 नंतर ज्या ठिकाणी अतिवृष्टी होऊन घरामध्ये पाणी शिरले व ज्यांचे नुकसान झाले आहे. केवळ त्यांनाच ही मदत दिली जाणार आहे. ही मदत या घटनांपुरतीच मर्यादित राहणार आहे.