मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्याअनुषंगाने सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र येत्या निवडणुकीनंतर विजयी झालेल्या पक्षाकडून आजच्या तरुणाईला काय अपेक्षा आहेत. आगामी सरकारकडून त्यांच्या काय मागण्या आहेत, याबाबत 'ईटीव्ही भारतचे' प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी तरुणाईचे मत जाणून घेतले...
आजची तरुणाई बेरोजगार आहे. त्यांना समाजकारण, राजकारण यात काही रस वाटत नाही. फक्त पार्टी आणि मनोरंजनात आजची तरुणाई मश्गूल आहे. समाजव्यवस्थेचे त्यांना भानही नाही. अशी अनेक तथाकथित मते आजची तरुण पिढी मोडून काढत आहे. निवडणुका जवळ आल्यावर कॉलेजच्या कट्ट्यापासून ते फेसबूक आणि ट्विटरपर्यंत सगळीकडे तरुणाई निवडणुकीबाबत आपली मते ठामपणे मांडत आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीबाबत तरुणाईच्या काय अपेक्षा आहे त्याबाबत माहिती देतना तरुणाई हेही वाचा-दम भरणारेच झाले नरम... शिवसेनेची सपशेल शरणागती
दरम्यान ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने त्यांना त्यांचे मत विचारले आसता तरुणाईने शिक्षण आणि नोकरी हे सर्वात महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर, शेतकऱ्यांचा सातबारा, मध्यम वर्गावरचे सगळे टॅक्स माफ करणे, ७२ हजारांवर नोकरभरती करणे, बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळणे, महागाई कमी होणे, शिव स्मारकाचे काम पूर्ण करणे, असे अनेक मुद्दे तरुणाईने मांडले.
हेही वाचा-विधानसभेच्या रणांगणात धडाडणार 'या' शिव व्याख्यात्यांच्या 'तोफा'!
तरुणांना या निवडणुकीबद्दल काय वाटत, उमेदवारांकडून काय अपेक्षा आहेत, याबद्दल विचारल्यावर ते याबाबत मोठ्या प्रमाणात जागृत असल्याचे दिसले. ते आपल्या विचारांच्या निकषानुसार उमेदवाराची पात्रता शोधतील व आपल्या निकषांवर खरा उतरणाऱ्या उमेदवारालाच ते मतदान करतील, असे यावरून दिसून येत आहे.