मुंबई: दिवाळी जसा दिव्यांचा, रंगाचा, फराळाचा सण आहे, तसाच दिवाळी फटाक्यांचा सण ( Diwali firecrackers festival ) आहे. फटाक्यांची मजाही काही औरच असते. पण हे फटाके फोडतांना जरा काळजी घ्यावी. ध्वनी प्रदूषण आणि वायूप्रदूषण करणारे फटाके टाळावेत. फटाके उडवत असाल तर विशेष काळजी ( Be careful while bursting crackers) घ्यावी. म्हणजे दिवाळीचा मनमुराद आनंद घेता येईल. फटाके फोडताना कशी काळजी घ्यावी ( How be careful while bursting crackers) आणि काय करू नये हो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Bursting Firecrackers : दिवाळीत फटाके फोडताना चुकूनही असे करू नका - blowing firecrackers
दिवाळी जसा दिव्यांचा, रंगाचा, फराळाचा सण आहे, तसाच दिवाळी फटाक्यांचा सण ( Diwali firecrackers festival ) आहे. फटाक्यांची मजाही काही औरच असते. पण हे फटाके फोडतांना जरा काळजी घ्यावी. ध्वनी प्रदूषण आणि वायूप्रदूषण करणारे फटाके टाळावेत. फटाके उडवत असाल तर विशेष काळजी ( Be careful while bursting crackers) घ्यावी. म्हणजे दिवाळीचा मनमुराद आनंद घेता येईल. फटाके फोडताना कशी काळजी घ्यावी ( How be careful while bursting crackers) आणि काय करू नये हो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कशी काळजी घ्याल :फटाके उडविण्यासाठी शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा. फटाके उडवतांना शक्यतो सुती कपडे वापरावेत. कारण सुती कपडे लवकर पेट घेत नाहीत. गाड्यांजवळ फटाके उडवू नका. कारण गाड्यांजवळ ऑईल, पेट्रोल सांडलेले असते. अशा वस्तूंचा लगेच भडका होऊन त्या पेट घेऊ शकतात. विजेच्या डिपीजवळ फटाके उडवणं टाळा. मोठा आवाज होणाऱ्या फटाक्यांपेक्षा शोभेचे आणि आसमंत उजळून टाकणारे फटाके वापरा. सुरसुऱ्या, फुलबाजा विझल्यानंतर त्या पाण्यात टाकाव्या. त्या इतरत्र टाकल्यास इतर कुणाचा पाय पडून भाजण्याची शक्यता असते. दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जा. भाजलेल्या भागाचा त्रास कमी होईपर्यंत थंड पाण्याखाली धरा. जर जखम गंभीर स्वरूपाची असेल तर घरगुती उपाय करण्याच्या फंदात न पडता दवाखाण्यात जावं. जर कुठे आग लागली असेल तर ती विझविण्यासाठी जाड पोते अथवा जाड चादरीचा वापर करावा.
या गोष्टी टाळा : वर दिलेल्या व्हिडीओमध्ये एक जण सिगारेटने रॉकेट उडवताना दिसत आहे. लहान मुेल असेच विचीत्र व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रकारे फटाके फोडण्याचा प्रयत्न करतात. त्यातून त्यांना भाजण्याची शक्यता असते. जिवाला सांभाळून फटाके फोडावेत. काही जण फटाके फोडताना अगरबत्ती, मेणबत्ती, सुरसुऱ्या वापरतात जे की धोकादायक असेत. फटाके फोडताना वडिलधाऱ्यांनासोबत घ्या. त्यांच्या निदर्शनाखाली किंवा वडिलधाऱ्यांसोबत सेफ दिवाळी साजरी ( Celebrate a safe Diwali with elders ) करा.